agriculture news in marathi, In the Pune market, 200 trucks have arrived in the arrivals | Agrowon

पुणे बाजारात भाजीपाल्याची २०० ट्रक आवक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे ः पावसाच्या उघडीपीमुळे खरिपातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरळीत हाेऊ लागल्याने बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ हाेऊ लागली आहे. गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) परराज्यांसह राज्याच्या विविध भागांतून भाजीपाल्याची सुमारे २०० ट्रक आवक झाली हाेती.

पुणे ः पावसाच्या उघडीपीमुळे खरिपातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरळीत हाेऊ लागल्याने बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ हाेऊ लागली आहे. गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) परराज्यांसह राज्याच्या विविध भागांतून भाजीपाल्याची सुमारे २०० ट्रक आवक झाली हाेती.

परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये प्रामुख्याने कर्नाटकातनू सुमारे २ टेंपाे मटार, इंदूरहून सुमारे ६ टेंपो गाजर, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ६ टेंपो शेवगा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हिरवी मिरची सुमारे २० टेंपो, कर्नाटक आणि गुजरात येथनू काेबी सुमारे ५ ट्रक आवक झाली हाेती. तर मध्य प्रदेश गुजरात येथून लसणाची सुमारे ५ हजार गाेणी आवक झाली हाेती.

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे दीड हजार गाेणी, टोमॅटो सुमारे ५ हजार क्रेट, फ्लॅावर १५ तर काेबी सुमारे ८ टेंपो, भुईमूग शेंग सुमारे १५० पोती, सिमला मिरची १२ टेंपो, भेंडी १२ टेंपो, हिरवी मिरची ५ टेंपाे, पावटा ८ टेंपाे, तांबडा भाेपळा १२ टेंपाे, काकडी १० टेंपाे तर वाई, सातारा, पारनेर पुरंदर भागातून मटारची सुमारे ३ हजार गाेणी आवक झाली हाेती. तसेच कांद्याची सुमारे ८० ट्रक तर आग्रा, इंदूर, तळेगाव व नाशिक बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडेचार हजार गोणींची आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : १००-१३०, बटाटा : १३०-१८०, लसूण : १५०-३००, आले सातारी : ३५०-४००, भेंडी : १००-२५०, गवार : गावरान - ३००-३५०, सुरती २५०-३००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १४०-१६०, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १४०-१५०, पापडी : २००-२२०, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ८०-१२०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १५०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २००-२२०, जाड : ९०-१००, शेवगा : ३००-४००, गाजर : १२०-१६०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१२०, घेवडा : २००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : २००-३००, मटार : स्थानिक - ३५०-४००, परराज्य : ३००-३५०, पावटा : १८०-२००, भुईमूग शेंग - २५०-३५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २४०-२५०, मका कणीस : ६०-१२० (१०किलो) नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर
पालेभाज्यांमध्ये काेथिंबीर सुमारे दाेन लाख तर मेथीची सुमारे ५० हजार जुड्या आवक झाली हाेती.कोथिंबीर : २००-५००, मेथी : ५००-९००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ४००- ५००, करडई : ४००-५००, पुदिना : ३००-४००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-६००, चवळई : ५००-६००, पालक : ४००-६००.

फळबाजार
फळ विभागात रविवारी (ता. ५) मोसंबी सुमारे ३० टन, संत्री २ टन, डाळिंब १०० टन, पपई २० टेंपोे, लिंबे सुमारे ६ हजार गोणी, चिकू ४०० गाेणी, पेरू २०० क्रेट्स, कलिंगड १५ टेंपो, खरबूज १० टेंपो, सीताफळाची ६ टन आवक झाली हाेती. फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५०-१३०, मोसंबी : (३ डझन) : १००-२००, (४ डझन) : ४०-८०, संत्रा : (३ डझन) १५०-३००, (४ डझन) : ८०-१५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : १५-६०, गणेश ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२५, पपई : ५-२०, चिकू : ७०-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, सीताफळ : २०-१५०

फूलबाजार
प्रति किलाेचे दर : झेंडू -१०-२०, गुलछडी ५५-८०, कापरी २०-४०, शेवंती ५०-७०, ॲस्टर (चार गड्ड्या) १५-२०, गुलाब गड्डी (१२ नगांचे दर) ५-१५, गुलछडी काडी १०-४०, डच गुलाब (२० नग) ३०-६०, लिली बंडल (५० काडी) ६-८, जरबेरा १०-३०, कार्नेशन ५०-८०, जुई -१००-१५०

मटण मासळी
आषाढ महिन्यामुळे मांसाहार वाढला असून, विविध ठिकाणी मेजवान्याचे देखील आयाेजन केले जात असल्याने मटण, चिकनसह विविध मासळींची मागणी वाढली आहे. परिणामी, मासळीच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गणेश पेठेतील घाऊक मासळी बाजारात खोल समुद्रातील सुमारे १४ टन, खाडीची ३०० किलो, नदीची ५ टन आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक झाली हाेती.  

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००, मोठे :  १४००, मध्यम : ९००-१०००, लहान : ७५०, भिला : ६००, हलवा : ७००, सुरमई : ६००-७००, मोठे १०००, रावस-लहान : ६५०, मोठे ९०० घोळ : ६५०, करली : ४००, भिंग : ४००, पाला : लहान ६०० मोठा १२००, वाम : पिवळी लहान ४०० मोठे ७५०, काळी : ४००, ओले बोंबील : लहान १६० मोठे २००.

कोळंबी ः लहान २००, मोठी : ४८० जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान २४०, मोठे ४००, मांदेली : १६० राणीमासा : २४०, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ४००-४८०,

खाडीची मासळी : सौंदाळे : ४४०, खापी : ३२०, नगली : लहान ३२० मोठी ६००, तांबोशी : ४८०, पालू : ३२०, लेपा : लहान १२० मोठे  २४० शेवटे : २८०, बांगडा : मोठे २००, लहान १६०; पेडवी : ५०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : १८० खुबे : १५०. तारली : १२०
नदीची मासळी : रहू : १५०, कतला : १५०, मरळ : लहान २८० मोठी ४८०, शिवडा : १६० चिलापी : ५०, मागूर : ११०, खवली : १६० आम्ळी : ६० खेकडे : १६०, वाम : ५००.

मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.
चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०.
अंडी : गावरान : शेकडा : ६५०, डझन : ९० प्रति नग : ७.५ इंग्लिश : शेकडा : ४०५ डझन : ६० प्रतिनग : ५.

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...