पुण्यात कांदा, गवार, काेबी, वांगी, शेवग्याचे दर वाढले

 गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.८) सीताफळाची झालेली आवक
गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.८) सीताफळाची झालेली आवक

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ८) भाजीपाल्याची सुमारे १८० ट्रकची आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक सुमारे ४० ते ५० ट्रकने घटली आहे. परिणामी, विविध भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कांदा, गवार, काेबी, वांगी, सिमला मिरची, मटार, शेवगा, कारल, घेवडा, बीट, पावटा यांचा समावेश आहे. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असून, काेथिंबिरीचा दर शेकड्याला ३ हजार रुपयापर्यंत वाढला आहे. गेल्या आठवडाभर राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या पावसामुळे शेतीमालाचे माेठे नुकसान झाल्याने आवक मंदावली असून, दरात वाढ झाल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नाेंदविले आहे. भाजीपाल्यांच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे १० टेंपाे हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक काेबी, कर्नाटकातून भुईमूग सुमारे २ टेंपाे, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे अडीच हजार गोणी, तर आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली हाेती. स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आले सुमारे २ हजार गाेणी, टोमॅटो सुमारे ६ हजार क्रेट्स, कोबी १५, तर फ्लाॅवर १२ टेंपाे, सिमला मिरची १२ टेंपाे, पारनेर, पुरंदर, वाई सातारा परिसरांतून मटार अवघा ५० गाेणी, तांबडा भाेपळा १० टेंपाे, भेंडी सुमारे १०, तर गवार सुमारे ६ टेंपाे, शेवगा १ टेंपाे, गाजर सुमारे १० टेंपाे, पावटा ४ टेंपाे, तर नवीन कांदा सुमारे २०, तर जुना ८० ट्रक आवक झाली हाेती. फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : नवीन १५०-२००, जुना २००-२५०, बटाटा : ६०-८०, लसूण : २५०-४५०, आले सातारी : २००-२६०, भेंडी : १५०-२००, गवार : गावरान व सुरती - ४००-५००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : २००-३००, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी २००-२२०, पांढरी : १००-१२०, पापडी : २००-२५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : २००-२५०, कोबी : २२०-२८०, वांगी : ३००-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १५०-२००, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ८००-१०००, गाजर : २००-२५०, वालवर : ३००-३५०, बीट : २४०-२५०, घेवडा : ४००-६००, कोहळा : १००-१४०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, मटार : स्थानिक : ७००-१४००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : ८०-१२०, भुइमूग शेंग - ३००-४००, सुरण : २५०-३००, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे अवघी ६० हजार, तर मेथीची सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती. कोथिंबीर : १५००-३०००, मेथी : १५००-१८००, शेपू : ७००-१०००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-७००, करडई : ५००-६००, पुदिना : ५००-७००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ७००-८००, चुका : ४००-५००, चवळई : ८००-१०००, पालक : १२००-१५००.

फळबाजार फळ बाजारात लिंबाची सुमारे ४ हजार गाेणी आवक झाली हाेती. माेसंबी सुमारे १०० टन, संत्रा सुमारे ४० टन, सीताफळ २० टन, डाळिंब सुमारे ८० टन, कलिंगड सुमारे २० टेंपाे, खरबूज सुमारे १० टेंपाे, पपई सुमारे २५ टेंपाे, चिकू सुमारे १ हजार बॉक्स, पेरू सुमारे ३०० क्रेटची आवक झाली हाेती. तर विविध बाेरांचा हंगाम सुरू झाला असून, सुमारे २५० गाेणी आवक झाली हाेती.  फळांचे दर पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : २००-४००, मोसंबी : (३ डझन) : १५०-२४०, (४ डझन ) : ८०-१३०, संत्रा (३ डझन) ८०-२००, (४ डझन) : ४०-१००, सूताफळ : ८-१००, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : ३०-१३०, गणेश १०-४०, आरक्ता २०-६०, कलिंगड ५-१०, खरबूज १०-२०, पपई ५-२० चिकू : १००-४०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ६००-८००, सफरचंद सिमला २०-२५ किलाे ११००- २०००, काश्मीर डेलिशिअस (१५) ७००-१३००, बाेर (१० किलाेचे दर) ः चेकनट ४००-४५०, चण्यामण्या ६००-६५०, चमेली १५०-१७०, उमराण १००-१२०.

फूलबाजार (प्रतिकिलोचे भाव) पुढीलप्रमाणे : झेंडू ५ - ३०, गुलछडी ६-३०, बिजली १०-३०, कापरी १०-२०, ॲस्टर ६ - १० (गड्ड्यांचे भाव), गुलाब गड्डी ८-१०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) २०-४०, लिली बंडल २-४, जरबेरा १०-२०, कार्नेशियन ५०-८०, शेवंती : २०-५०, माेगरा ४००-६००, जुई ३००-४००.

मटण मासळी गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ८) खोल समुद्रातील मासळींची सुमारे ८ टन, खाडीची सुमारे २०० किलो, आणि नदीतील मासळीची सुमारे ४०० किलाे आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे ८ टन आवक झाली हाेती. आजची रविवार (ता.८) चतुर्थीचा आणि उद्याचा साेमवारचा हे सलग दाेन उपवासाचे दिवस आल्याने मासळीची मागणी घटली हाेती.    भाव (प्रतिकिलो) - पापलेट ः कापरी ः १४००, माेठे ः १३००, मध्यम ः ७५०, लहान ः ५५०, भिला ः ३६०, हलवा ः ४४०, सुरमई ः ४४०, रावस लहान ः ४८०, मोठा ः ६५०, घोळ ः ४८०, करली ः २८०, करंदी ( सोललेली ) ः २००, भिंग ः २४०, पाला : ६००-१४००, वाम ः ४००, ओले बोंबील ः ६०-१२०. कोळंबी ः लहान : २४०, मोठी :४८०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स ः ७५०, लॉबस्टर ः १४५०, मोरी : १४०-२४०, मांदेली : ८०-१००, राणीमासा : १४०-१८०, खेकडे : १४०-१८०, चिंबोऱ्या : ४००-४८०. खाडीची मासळी ः सौंदाळे ः २००, खापी ः १६०-२००, नगली ः २८०-४००, तांबोशी ः ३६०-४००, पालू ः २००, लेपा ः १४०-१८०, शेवटे : १८०-२४०, बांगडा : १४०-१८०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १२०, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००. नदीची मासळी ः रहू ः १६०, कतला ः १८०, मरळ ः ४००, शिवडा : १६०, चिलापी : ८०, मांगूर : १२०, खवली : १४०, आम्ळी ः ८०, खेकडे ः १६० वाम ः ४०० मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०. चिकन ः चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०. अंडी ः गावरान - शेकडा : ६००, डझन : ८४, प्रति नग : ७ इंग्लिश शेकडा : ४०५, डझन : ६०, प्रतिनग : ५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com