पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिर

गुलेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५)  कोबी, फ्लॉवरची झालेली आवक
गुलेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) कोबी, फ्लॉवरची झालेली आवक

पुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील भाजीपाल्याच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १५) आवक घटली होती. तुलनेत मागणीही कमी असल्यामुळे भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले आहेत. गेल्या पंधरवड्यापासून बाजारातील आवक घटल्याने भाजीपाल्याच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने तेजी कायम राहिली.     भाजीपाल्याची परराज्यातून होणारी आवक कमी झाली आहे. कर्नाटक (५ ते ६ ट्रक कोबी), कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, गुजरात (१८ ते २० टेम्पो हिरवी मिरची ), शेवगा दोन टेम्पो एवढीच आवक झाली. मध्य प्रदेशातून सुमारे अडीच हजार गोणी, इंदौर आणि आग्रा भागातून बटाट्याची एकूण ६० ते ६५ ट्रक इतकी आवक झाली आहे.  स्थानिक भागातून जुन्या कांद्याची सुमारे १०० ट्रक, नवीन कांदा (२ ते ३ ट्रक)  सातारी आले (१४००-१६०० गोणी), टोमॅटो (पाच ते साडे पाच हजार क्रेटस), सिमला मिरची (८ ते १० टेम्पो ), कोबी ( १५ ते १६  टेम्पो ), फ्लॉवर ( १४ ते १५  टेम्पो ), तांबडा भोपळा ( ८ ते १० टेम्पो  ), भेंडी ( ८ ते १० टेम्पो ), गवार  ( ५ ते ६ टेम्पो ), हिरवी मिरची (७ ते ८ टेम्पो),  गाजर ( ३००गोणी  टेम्पो ), पावटा ( ३ ते ४ टेम्पो ), मटार (४५० ते ५०० गोणी), भुईमूग शेंग (७० ते ८० गोणी) शेवग्याची एक टेम्पो इतकी आवक झाली.   

फळभाज्यांचे दहा किलोचे दर भाव कांदा ः नवा १५० - २००, जुना २००-२५०, बटाटा ः ७० - १४०, लसूण :  २५० - ४५० ( ८० - १२०), आले ः सातारी :  २२० - २८०, भेंडी : १५० - २००, गवार ः गावरान :  ३०० - ५००, सुरती ः ३०० - ५००, टोमॅटो : १६० - २२०, दोडका : २०० - ३००, हिरवी मिरची : १५० - २५०, दुधी भोपळा : १५० - २००, चवळी : २०० - २५०, काकडी ः ६० - १००, कारली : हिरवी :  २०० - २५०, पांढरी : १५०-१६०, पापडी : २००- २५०, पडवळ :  २५० - २८०, फ्लॉवर : २०० - ३००, कोबी : १४० - २४०, वांगी : ३०० - ४००, डिंगरी : २०० - २५०, नवलकोल : १४० - १६०, ढोबळी मिरची : ३०० - ३५०, तोंडली कळी : २५० - ३००, तोंडली जाड : १००- १२०, शेवगा :  ८००-१०००, गाजर : १८० - २५०, वालवर : ३०० - ३५०, बीट : २०० - २५०, घेवडा : ४०० - ५००, कोहळा : ८० - १२०, आर्वी : २०० - २५०, घोसावळे : १६० -१८०, ढेमसे : २०० - २५०, भुईमूग शेंग : ३०० - ४००, मटार :  स्थानिक : ७०० - १०००, पावटा : ६००-६५०, तांबडा भोपळा : ८० - १२०, सुरण ः २८० - ३००, नारळ ः १००० - १६००, मका ः (प्रति १० किलो) ५० - ८०.

पालेभाज्यांचे दर (शेकडा) ः  कोथिंबीर ः १५०० - २५००, मेथी : १००० - ११००, शेपू : ७०० - १०००, कांदापात : ५०० - १०००, चाकवत : ७०० - ८००, करडई : ५०० - ६००, पुदिना : ३०० - ५००, अंबाडी : ५०० - ८००, मुळे :  ५०० - १०००, राजगिरा : ५०० - ६००, चुका : ८०० - १०००, चवळई : १००० - १२००, पालक : १००० - १२००. 

फळांचे दर लिंबे (प्रति गोण) : १५० - २५०, अननस (प्रति डझन ) : ७० - २७०, डाळिंब : (प्रति किलो) आरक्ता : १० - ४०, गणेश : १० - ४०, भगवा : ३० -१२०, मोसंबी : (३ डझन) १४० - २५०, ४ डझन : ८० - १५०, संत्रा : (३ डझन ) १०० - २००, (४ डझन ) ६० - १२०, पपई : ( प्रति किलो) ५ - २०, कलिंगड : (किलो) ५ - ८, खरबूज : (किलो) १० - २०, चिक्कू : (१० किलो) १०० - ४००, पेरु ( २० किलो) २००-५००, सिताफळ: (१ किलो) ५ - १२०, सफरचंद ः सिमला (२५ किलो) १००० - २२००,  कश्‍मिर डेलिशिअस (१३ ते १५ किलो) ६०० - १३००, किन्नूर (२५ किलो)  २०००-२७००, पेअर : १३ ते १५ किलो ६००-१२००, बोर : (१० किलो), चेकनट : ३००-४००, चण्यामण्या : ४००-४५०, चमेली : १३०-१५०, उमराण : ८०-११०.  फूल बाजार (प्रतिकिलोचे भाव) झेंडू : १० - ६०, गुलछडी :१० - ३०, बिजली : ३० - ४०, गुलछडी काडी : १० - ४०, कापरी : २० - ३०, शेवंती : १० - २०, ॲस्टर : १० - २०, गुलाब गड्डी : १० - २०, डच गुलाब : ३० - ६०, ग्लॅडिएटर : ५-१०, लिली : ३ - ६, जरबेरा : १० - २०, कार्नेशियन : ६० - १२०, अबोली लड  : १०० - १५०, मोगरा ३००-५००.

मटण-मासळी गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १५) खोल समुद्रातील मासळी (१० ते १२ टन), खाडी (४०० किलो) आणि नदीतील मासळीची (५०० ते ६०० किलो) इतकी आवक झाली. गेल्या रविवारच्या तुलनेत या रविवारी खोल समुद्र, खाडी आणि नदी अशा सर्व मासळीची आवक दुप्पट झाली आहे. आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची आवकही ( १४ ते १५ टन) दुप्पट झाली.  भाव (प्रतिकिलो) पापलेट ः कापरी ः १४००, मोठे ः १२००, मध्यम ः ८००, लहान ः ५५०, भिला ः ३६०, हलवा ः ४४०, सुरमई ः ४४०, रावस - लहान ः ४४०, मोठा ः ६००, घोळ ः ५००, करली ः २८०, करंदी ( सोललेली ) ः ३००, भिंग ः २००, पाला : ६०० -१४००, वाम ः पिवळी १६०-३६०, काळी : १६०-२८०, ओले बोंबील ः ६० -१००. कोळंबी ः लहान : २००, मोठी : ३६०, जंबो प्रॉन्स : १४५०, किंग प्रॉन्स ः ७००, लॉबस्टर ः १५००, मोरी : २४०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४०० - ४८०. खाडीची मासळी ः सौंदाळे ः २००, खापी ः १८०, नगली ः २८० - ४८०, तांबोशी ः ४००, पालू ः २४०, लेपा ः १४० -२००, शेवटे : २००, बांगडा : १४०-१८०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००-१२०, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००. नदीची मासळी ः रहू ः १५०, कतला ः १८०, मरळ ः ४००, शिवडा : १२०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १६०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १६०, वाम ः ४००. मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०. चिकन ः चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०. अंडी ः गावरान शेकडा : ६५०, डझन : ९०, प्रति नग : ७.५०, इंग्लिश शेकडा : ३९५, डझन : ६०, प्रतिनग : ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com