agriculture news in Marathi, Pune Water dispute in court | Agrowon

पुण्याचा पाणी वाद न्यायालयात
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

पुणे ः पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वार्षिक कोट्याबाबत निर्माण झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोचला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहराला वर्षाला साडेअकरा टीएमसी पाणी द्यावे आणि जिल्ह्यातील शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी करणारी याचिका इंदापूर तालुका खडकवासला प्रकल्प लाभधारक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

पुणे ः पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वार्षिक कोट्याबाबत निर्माण झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोचला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहराला वर्षाला साडेअकरा टीएमसी पाणी द्यावे आणि जिल्ह्यातील शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी करणारी याचिका इंदापूर तालुका खडकवासला प्रकल्प लाभधारक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांपैकी वरसगाव व पानशेत ही दोन धरणे फक्त शेतीसाठी बांधली असल्याचा दावा पाटील यांनी याचिकेत केला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने पुणे महापालिका, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक आदींना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र जलसंपदा नियामक मंडळाने पाणीवाटपाबाबत निश्‍चित केलेल्या नियमानुसार खडकवासला प्रकल्पातील ५.०७ टीएमसी (१५ टक्के) पाणी पिण्यासाठी, १० टक्के पाणी उद्योगांसाठी (३.३८ टीएमसी) आणि सिंचनासाठी ७५ टक्के (२५.३२ टीएमसी) असा कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात सिंचनासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नाही. मात्र शहराला दरवर्षी जास्तीचे पाच टीएमसी पाणी बेकायदा वितरित केले जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

महापालिकेला उच्च न्यायालयाची तंबी  
याबाबत म्हणणे मांडण्यासाठी १३ मार्चला हजर राहण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला दिला होता. मात्र या तारखेला पालिकेचा एकही अधिकारी किंवा प्रतिनिधी न्यायालयाकडे फिरकलाही नाही. त्यामुळे न्यायालयाने पालिकेच्या या कृत्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पुढील सुनवाणी २३ मार्चला ठेवली. या तारखेला पालिकेचा प्रतिनिधी येवो अथवा न येवो, एकतर्फी निर्णय घेतला जाईल, अशी तंबीही पालिकेला दिली आहे.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...