agriculture news in marathi, Pune ZP's animal husbandry officers inquiry will done | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याची होणार चौकशी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये गोलमाल झाला आहे, असा आरोप करत भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. या प्रकरणी चौकशी करून सोमवारपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये गोलमाल झाला आहे, असा आरोप करत भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. या प्रकरणी चौकशी करून सोमवारपर्यंत अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये बुट्टे पाटील यांनी पशुसंवर्धन विभागामध्ये राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही, शेतकऱ्यांचे हित पाहिले जात नाही. तसेच कामधेनू योजनेचा निधी हडपण्याचा प्रकार झाला असल्याचा आरोप केला. जिल्हा परिषदेच्या वतीने खरेदी केलेल्या जनावरांसाठी सोनोग्राफी मशिन धूळ खात पडल्या असून, त्यांचा वापर होत नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून घेतलेल्या मशिन बंद अवस्थेत आहे़त, त्यामुळे जिल्हा परिषदेचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. यास पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पवार जबाबदार असल्याचे बुट्टे-पाटील यांनी सभागृहात सांगितले. 

जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनीही सोनोग्राफी मशिन बंद असून, शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रणजित शिवतारे यांनी यांनी डॉ. पवार यांचा पदभार काढून घेण्याची मागणी केली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी सांगितले, की पवार यांचा पदभार काढून घ्यावा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा असे सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे म्हणाले, की सदस्यांनी केलेल्या तक्रारी आणि समस्या लक्षात घेता जिल्हा परिषदेची बदनामी होईल असे चित्र आहे. त्यामुळे प्रथम याबाबतची चौकशी करू, दोषी आढळल्यास अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही मांढरे यांनी दिले.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...