जीएसटीअंतर्गत येणाऱ्या कृषिकरांचा फेरआढावा घ्या ः अमरिंदरसिंग
पीटीआय
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

जीएसटीमुळे उत्पादनखर्चात आणखी वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आरोग्य बिघडत जाण्याची भीती आहे.
- अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री, पंजाब

चंडीगड, पंजाब ः कृषी क्षेत्रातील महत्त्वाची अवजारे आणि शेतमालावर वस्तू व सेवाकरांतर्गत (जीएसटी) विविध कर लावण्यात आले आहेत. शेतकरी हितासाठी या करांचा फेरआढावा घ्यावा, असे पत्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

मुख्यमंत्री सिंग यांनी पत्रात असे नमूद केले आहे, की खतांवर याआधी 2 टक्के व्हॅट आकारला जात होता. आता 5 ते 18 टक्‍क्‍यांपर्यंत जीएसटी लागू झाला आहे. कीटकनाशकांवर 12.5 टक्के असलेला व्हॅट जाऊन आता 18 टक्के जीएसटी आणला गेला आहे.

तसेच शेती निविष्ठांसह ठिबक सिंचनाची अवजारे, ट्रॅक्‍टर, सूक्ष्मपोषके (मायक्रोन्यूट्रियंट), प्रक्रियायुक्त पॅकेज्ड अन्नपदार्थ आणि इतर अनेक बाबींवरही मोठ्या प्रमाणावर करमर्यादा वाढविण्यात आली आहे. याचा प्रतिकूल परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होत आहे. यामुळे पंतप्रधानांनी यात लक्ष घालून या करांचा फेरआढावा घ्यावा.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या...
‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर...
सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७...सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची...
औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा... अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद...