agriculture news in marathi, Punjab farmers demand viable solution for stubble burning | Agrowon

पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर शेतकरी ठाम
वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी झुगारून देत हरियाना आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाचे अवशेष अद्यापही जाळत असल्याचे चित्र समोर आले आहे. जमिनीतील पिकांचे अवशेष नष्ट करण्यासाठी सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आर्थिक साह्य मिळत नसल्याचा दावा करीत पिकांचे अवशेष जाळण्याशिवाय पर्याय नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी झुगारून देत हरियाना आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाचे अवशेष अद्यापही जाळत असल्याचे चित्र समोर आले आहे. जमिनीतील पिकांचे अवशेष नष्ट करण्यासाठी सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आर्थिक साह्य मिळत नसल्याचा दावा करीत पिकांचे अवशेष जाळण्याशिवाय पर्याय नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हरियाना आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष जाळल्यामुळे या दोन राज्यांसह दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार धरत हरियाना आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना पिकांचे शेतातील अवशेष जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रदूषणाचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. पिकांचे अवशेष जाळण्यावर सरकारने बंदी घातली आहे; मात्र त्या बदल्यात शेतातील अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
पंजाबमध्ये शेतातील पिकांचे अवशेष जाळण्याच्या ३३० घटना, तर हरियानात ७०१ घटना समोर आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भातपिकाचे अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये चालू वर्षी घट झाल्याचा दावा अधिकारी करीत आहेत.

भातपिकाचे अवशेष जाळण्याची शेतकऱ्यांचीही इच्छा नाही. मात्र, यासाठीचा इतर कुठलाही कमी खर्चिक पर्याय शेतकऱ्यांसमोर उपलब्ध नाही, त्यामुळे इच्छा नसतानाही त्यांना हा निर्णय घेणे भाग पडते. 
- बलबीरसिंग राजेवाल, भारतीय किसान युनियन

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...