agriculture news in marathi, Punjab hikes cane price by Rs 10 per quintal | Agrowon

पंजाबमध्ये उसाच्या ‘सॅप’मध्ये क्विंटलमागे १० रुपयांनी वाढ
पीटीआय
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

चंडीगड, पंजाब : अमरिंदर सरकारने सोमवारी (ता. २७) उसाच्या राज्य निर्धारित मूल्यात (सॅप) क्विंटलमागे १० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार होणारी मागणी आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चंडीगड, पंजाब : अमरिंदर सरकारने सोमवारी (ता. २७) उसाच्या राज्य निर्धारित मूल्यात (सॅप) क्विंटलमागे १० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार होणारी मागणी आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोआबा, माळवा आणि माझा परिसरांतील ऊस उत्पादकांनी उसाच्या दरात वाढ करावी; अन्यथा विधिमंडळाला घेराव घालण्यात येईल, असे सरकारला बजावले होते. यामुळे सरकारला तातडीने उसाच्या राज्य निर्धारित मूल्यात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. याविषयी विरोधी पक्षांनीही विधिमंडळात राज्य सरकारला विरोध करण्याचे मनसुबे जाहीर केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १६ साखर कारख्यांना ६७५ लाख क्विंटल ऊस उपलब्ध होणार आहे. राज्यात ९ सहकारी तर ७ खासगी साखर कारखाने आहेत. ऊस उत्पादकांची मागणी, आंदोलनांची शक्यता आणि विरोधी पक्षांनी राज्य सरकारला विधिमंडळात घेरण्याची तयारी, याचा विचार करून राज्य मंत्रिमंडळाने एकमताने सॅप वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी झालेल्या बैठकीत विविध ऊस उत्पादक संघांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

पंजाबमध्ये कॉँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनतर आता राज्य निर्धारित मूल्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारला २० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे. असे असले तरी हरियानातील सॅप हा पंजाबपेक्षा जास्त आहे. हरियानात लवकर येणाऱ्या उसाला ३३० रुपये, मध्यम प्रकाराला ३२० तर उशिरा येणाऱ्या उसाला प्रतिक्लिंटल ३१० रुपये राज्य निर्धारित मूल्य आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...