agriculture news in marathi, The purchase of agricultural commodities start at the Sirsam market committee | Agrowon

सिरसम बाजार समितीत शेतीमालाची खरेदी सुरू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

हिंगोली  : सिरसम बुद्रुक (ता. हिंगोली) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार (ता.६) पासून शेतीमालाच्या जाहीर लिलाव पद्धतीने खरेदीस सुरवात करण्यात आली आहे. यामुळे या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ५६ गावातील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी जवळची सुविधा उपलब्ध झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून ६ मे २००८ मध्ये सिरसम येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु, सुविधांअभावी तेथे शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गेल्या काही वर्षांपासून बंद होते.

हिंगोली  : सिरसम बुद्रुक (ता. हिंगोली) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार (ता.६) पासून शेतीमालाच्या जाहीर लिलाव पद्धतीने खरेदीस सुरवात करण्यात आली आहे. यामुळे या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ५६ गावातील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी जवळची सुविधा उपलब्ध झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून ६ मे २००८ मध्ये सिरसम येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु, सुविधांअभावी तेथे शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गेल्या काही वर्षांपासून बंद होते.

सोमवारी (ता.६) माजी खासदार अॅड. शिवाजी माने यांच्या हस्ते या सिरसम बुद्रुक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाच्या खरेदी -विक्रीस सुरवात करण्यात आली. या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार गजानन घुगे, हिंगोली बाजार समितीचे सभापती हरिचंद्र शिंदे, कळमनुरीचे सभापती संजय कावडे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, कक्ष अधिकारी ए. जी. राठोड, मुख्यप्रशासक पंडितराव मस्के, गोपाळराव इंगळे, रामकिशन कोळपे, ध्रुपत कांबळे,दुलाजी नांदे, कांतीलाल जैस्वाल, शंकर जाधव, परसराम जाधव, संजय गरुड आदी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी ३०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.आमदार मुटकुळे यांनी सिरसम बाजार समितीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू देण्याचे आश्वासन दिले. श्री. घुगे यांनी व्यापाऱ्यांकडून सहकार्य केले जाईल असे सांगितले. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या यार्डावरच शेतीमालीची विक्री करणे आवश्यक आहे असे सांगितले. हिंगोली बाजार समितीचे माजी सचिव डाॅ. जब्बार पटेल यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक
सिरसम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार तब्बल आठ वर्षांपासून बंद होते. दरम्यानच्या काळात या बाजार समितीतील कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सध्या अन्य बाजार समित्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाज करावे लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरावी लागणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...