शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे शेतीमालाची खरेदी

शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे शेतीमालाची खरेदी
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे शेतीमालाची खरेदी

जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासनाकडून खरेदीसंबंधीची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी सबएजंटची नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव मागविले असून, ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.

उडदाचा हमीभाव ५६००, मुगाचा ६९७५ आणि सोयाबीनचा हमीभाव ३३९९ रुपये प्रतिक्विंटल आहे. परंतु त्यापेक्षा कमीच दर सध्या मिळत आहेत. उडदाला ३५०० ते ४०००, मुगालाही ३२०० ते ४००० आणि सोयाबीनला ३००० रुपये प्रतिक्विंटलपासून दर आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हमीभावात खरेदीची सक्ती व्यापाऱ्यांना करण्याचा प्रयत्न शासनाने केला, परंतु व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली, त्यात उडीद व मुगाचे दर आणखी कमी झाले. या सगळ्या स्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शासकीय शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. यानुसार जिल्हा प्रशासनाने मार्केटिगं फेडरेशनच्या मदतीने कार्यवाही केली असून, जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे तीन खरेदी केंद्रे सुरू करण्याची तयारी केली आहे. सबएजंट नेमणुकीचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मार्केटिंग फेडरेशनच्या मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी पुढील आठवड्यात मिळू शकते.

शासनाकडून आदेश मिळताच खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. त्याची सुविधा संबंधित तालुक्‍यात खरेदीसाठी नेमणूक केलेल्या सबएजंट यांच्या यंत्रणेकडे उपलब्ध करून दिली जाईल. आधार, बॅंक खाते क्रमांक, सातबारा (पीकपेरा नोंद) आवश्‍यक असेल. पुढील आठवड्यात किंवा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाची मंजुरी मिळू शकते, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com