गडचिरोलीत विक्रमी ८० कोटी रुपयांची धान खरेदी

गडचिरोलीत विक्रमी ८० कोटी रुपयांची धान खरेदी
गडचिरोलीत विक्रमी ८० कोटी रुपयांची धान खरेदी

गडचिरोली ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून सुुमारे ८० कोटी ८६ लाख ५ हजार ४७२ रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे. एकूण ८५ केंद्रांवर ४ लाख ६२ हजार क्‍विंटल धान खरेदी करण्यात आली. 

आदिवासी विकास महामंडळाच्या सूत्रांनी या संदर्भाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अवघी सव्वातीन लाख क्‍विंटल धानाची खरेदी झाली होती. त्या तुलनेत यावर्षीच्या जानेवारीत धान खरेदी कित्येक पट वाढली आहे. धानाची आवक सध्याही सुरू असल्याने यावर्षी ती रेकॉर्डब्रेक होईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने २०१८-१९ या खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ‘अ’ प्रतीच्या धानाला प्रतिक्‍विंटल १ हजार ७७० रुपये तर साधारण प्रतीच्या धानाला १ हजार ७५० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतू अद्यापपर्यंत ‘अ’ प्रतीच्या धानाची एक क्‍विंटलही आवक ८३ पैकी एकाही केंद्रावर झाली नाही. 

साधारण प्रतीचाच धान खरेदी केंद्रावर पोचत असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अहेरी उपप्रादेशिक कार्यालया अंतर्गत एकूण ६० हजार २९२ क्‍विंटल धान भरडाईसाठी राईसमिलमध्ये पाठविणात आले आहे. गडचिरोली कार्यालयाअंतर्गत ९७ हजार ९४२ क्‍विंटल तर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने २ हजार ३५० क्‍विंटल धान भरडाईसाठी पाठविले गेले आहे.

अशी आहे आवक महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट या उपप्रादेशिक कार्यालयाच्या एकूण ५० केंद्रावर १० जानेवारीपर्यंत ३ लाख ५१ हजार २९ क्‍विंटल धानाची खरेदी झाली आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ३५ केंद्रावर १ लाख ११ हजार २० क्‍विंटल धान खरेदी झाली. जिल्हाभरात ९ हजार ९२७ शेतकऱ्यांच्या धानापोटी ५१ कोटी ९ लाख ८८ हजार ५०२ रुपयांचे चुकारे शिल्लक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com