agriculture news in marathi, purchse milk with lower rate, jalgon, maharashtra | Agrowon

जळगाव येथे खासगी खरेदीदारांकडून कमी दराने दूध खरेदी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 डिसेंबर 2017
खर्च वाढला, पण उत्पन्न कमी अशी आमची अवस्था झाली आहे. दूध दर कमी झाल्याने लाखो रुपयांची लूट खासगी खरेदीदार करीत आहेत. 
- संदीप नारखेडे, दूध उत्पादक, आसोदा, जि. जळगाव
जळगाव : दुधाचे दर सहकारी संस्थांनी लिटरमागे तीन रुपयांनी घटविल्यानंतर खासगी खरेदीदारांनी दूध उत्पादकांची लुबाडणूक सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान रोज होत आहे. 
 
गायीच्या दुधाला २१ रुपये दर तर म्हशीच्या दुधाला ३० ते ३१ रुपये दर खासगी खरेदीदार देत आहेत. खासगी खरेदीदारांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. सहकारी दूध सोसायटीत गायीच्या दुधाला प्रतिलीटर २४ रुपयांपर्यंत तर म्हशीच्या दुधाला ३३ रुपये दर एक लिटरमागे मिळत आहे.
 
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ऑक्‍टोबरमध्ये दूध दरात कपात केली. म्हैस व गायीचे दूध दर लिटरमागे तीन रुपये कमी केले. संघाचे दूध संकलन ३० ते ३५ हजार लिटरने वाढले, शिवाय दूध पावडर व लोणीला हवा तसा उठाव नाही. दूध पावडरचे दर कमी झाले म्हणून दुधाचे खरेदी दर कमी केले आहेत. दूध संघाचे रोजचे संकलन दोन लाख लिटरवर पोचले आहे. त्यात गायीच्या दुधाची अधिक आवक आहे.  

दूध दर कमी झाले, पण पशुखाद्याचे दर कमी झाले नाहीत. चाराही निकृष्ट असून दादरचा कडबा ३५०० रुपये शेकडा तर मक्‍याचा कडबा १२०० रुपये शेकड्यापेक्षा अधिक दरात मिळतोय. दादरचा चारा कमी आहे. मक्‍याचा चारा निकृष्ट झाला आहे.

ज्वारीची पेरणीच कमी होती. आणि पावसाच्या लहरीपणाचा फटका ज्वारीला बसल्याने चारा हवा तसा नाही. एकीकडे उत्पादन खर्च वाढला, दुसरीकडे दूध दर कमी असल्याने मोठे आर्थिक नुकसान दूध उत्पादकांना सहन करावे लागत आहे. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...