शुद्ध, सुरक्षित पाणी ‘स्वजल’ योजनेचा उद्देश ः सहसचिव व्ही. राधा

शुद्ध, सुरक्षित पाणी ‘स्वजल’ योजनेचा उद्देश ः सहसचिव श्रीमती व्ही. राधा
शुद्ध, सुरक्षित पाणी ‘स्वजल’ योजनेचा उद्देश ः सहसचिव श्रीमती व्ही. राधा

पुणे : वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाला पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि इतर घरगुती वापरासाठी स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे, हाच ‘स्वजल’ योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती व्ही. राधा यांनी व्यक्त केले.

युनिसेफ, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, भारत सरकार आणि ‘स्वजल’ योजना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हॉटेल क्राऊन येथे दोन दिवसीय राष्ट्रीय ‘स्वजल’ कार्यशाळा आयोजित केली होती. त्या वेळी श्रीमती व्ही. राधा या बोलत होत्या.

या कार्यशाळेला युनिसेफचे निकोलस ऑसबेर्ट, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे उपसचिव श्रीमती रणजीथा यांच्यासह विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड म्हणाले, पिण्याचे पाणी हा प्रत्येक मानवाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ पाण्याबरोबरच पाणी गुणात्मक असणे आवश्यक आहे. मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक खनिजद्रव्ये नैसर्गिक पाण्यात असतात, मात्र पाणी शुद्धिकरणाच्या नावाखाली आपण ही सर्व आवश्यक खनिजद्रव्ये पाण्यातून काढून टाकतो. त्यामुळे पाणी शुद्धिकरणाची अनावश्यक प्रक्रिया बंद करण्याची आवश्यकता आहे. शुद्ध पाण्याबरोबरच गुणात्मक पाण्यासाठी आपण आग्रही राहीले पाहिजे.

या कार्यशाळेत ‘स्वजल’ योजनेसाठी केंद्रिय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा, ‘स्वजल’साठी पर्याय, स्त्रोत बळकटीकरण, ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा संस्था कार्य, समाजाकडून ग्रामीण पाणीपुरवठा संस्था चालविणे आणि देखभाल या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून त्यावर सामूहिक चर्चा करण्यात येणार आहे. तसेच केंदूर (ता. शिरूर) आणि कन्हेरसर (ता. खेड) या गावांना भेटी देऊन तेथील पाणीपुरवठा योजनांची पाहणी करण्यात आली. मिलिंद देशपांडे यांनी आभार मानले.

स्वजल योजनेबाबत पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये योजनेची कार्यान्वितता, मांडणी, आर्थिक तरतूद, योजनेच्या भागधारकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यांचा समावेश करण्यात आला आहे. स्थानिक गरजेनुसार त्यात लवचिकता ठेवण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला आहे. ही योजना गुणात्मक आणि दर्जेदारपणे चालावी हाच या मागचा उद्देश आहे. - श्रीमती व्ही. राधा, केंद्रिय सहसचिव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com