agriculture news in marathi, Purrushottam Bhapkar will be new Secretary for Animal Husbandry | Agrowon

पशुसंवर्धन सचिवपदी पुरुषोत्तम भापकर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मुंबई : औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर यांची वर्षभरातच पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास विभागांत सचिवपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच सरकारने बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी काढले.

मुंबई : औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर यांची वर्षभरातच पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास विभागांत सचिवपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच सरकारने बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी काढले.

भापकरांनी पूर्वी औरंगाबाद महापालिकेत आयुक्‍त म्हणून काम केले होते. वर्षभरापूर्वी त्यांनी विभागीय आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर विभागात प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिनाभरापूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. भापकर यांनी देवेंद्र कटके आणि विश्‍वंभर गावंडे या दोन उपजिल्हाधिकाऱ्यांचे निलंबन केले होते. मात्र त्यांचा हा निर्णय अमान्य करत कटके यांनी एक कोटीची लाच मागितल्याचा आरोप भापकरांवर केला होता. कारवाईच्या विरोधात ते उच्च न्यायालयात गेले होते, मात्र राज्य शासन भापकरांच्या निर्णयाबरोबर ठाम राहिले. कटके यांनी भापकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीची तक्रार पोलिसांत दिली आहे. हा एकूण विषय वादग्रस्त झाल्याने राज्य सरकारने त्यांची अखेर बदली केल्याची चर्चा आहे.

शेतकरी कर्जमाफीतील गोंधळावरून आयटी विभाग टीकेचा धनी ठरल्याने या विभागाचे सचिव व्ही. के. गौतम यांची बदली वित्त विभागात करण्यात आली होती. त्यास काही महिन्यांचा अवधी लोटत नाही. तोच गौतम यांची पुन्हा दुसऱ्यांदा बदली करत त्यांची नियुक्ती पर्यटन व सांस्कृतिक खात्याच्या प्रधान सचिवपदी राज्य सरकारने केली आहे. याशिवाय के. एच. कुलकर्णी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून आदिवासी विभागाच्या संशोधन व प्रशिक्षण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. तर नुकतेच महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले सनदी अधिकारी माणिक गुरसाळ यांची तेथून बदली करत शैक्षणिक शुल्क प्राधिकरणाच्या सचिवपदी करण्यात आली.

ए. ए. गुल्हाने यांची औद्यौगिक विकास महामंडळावरून बदली करत वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली. तर नीमा अरोरा यांची नंदुरबार येथील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी पदावरून जालन्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली. बी. पी. पृथ्वीराज यांचीही भंडारा येथील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी पदावरून परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. तर अमोल येडगे यांचीही नाशिकच्या आयटीडीपी प्रकल्प अधिकारी पदावरून बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. याशिवाय मनीषा खत्री यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय सचिन ओंबासे यांना आहेरीतून गडचिरोलीच्या आयटीडीपी प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...