कृषीच्या समस्या समोरासमोर बसून सोडवू ः पुरुषोत्तम रुपाला

कृषीच्या समस्या समोरासमोर बसून सोडवू ः पुरुषोत्तम रुपाला
कृषीच्या समस्या समोरासमोर बसून सोडवू ः पुरुषोत्तम रुपाला

नगर ः शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कृिषक्षेत्रातील विविध समस्या समोरासमोर बसून सोडविण्यात येतील. नव्याने कीटकनाशके, परवाने काढण्यासाठी ‘बीएस्सी' ॲग्री पदविका आवश्‍यक आहे. जुन्या पारवानाधारकांचे परवाने सुरू ठेवण्यासाठी केंद्र शासन क्रॅश कोर्स काढण्याच्या विचाराधीन आहे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले. कोकमठाण (ता. कोपरगाव) येथे अग्रो इनपूट डीलर्स असोसिएशनच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते शनिवारी (ता.७) झाले. रसी सीडसचे अध्यक्ष एम. रामास्वामी, एनएसएल ग्रुपचे अध्यक्ष एम. प्रभाकरराव, एफएमसीचे वाणिज्य संचालक एस. एन. श्रीनिवास, खासदार रामचंद्रन बोहरा, जयपूरचे आमदार मोहनलाल गुप्ता, शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम खंडेलवाल यांची उपस्थिति होती. श्री. रुपाला म्हणाले, की कीटकनाशक व्यापाऱ्यांनी हस्तलिखित साठा न ठेवता संगणकावर नोंद केल्यास तो ग्राह्य धरला जाईल. कीटकनाशकाचे परवाने घेण्यासाठी ‘बीएस्सी' ॲग्री पदवीधारक असणे आवश्‍यक आहे. मात्र, जुन्या पारवानाधारकांच्या मागणीनुसार परवाने नूतनीकरणासाठी ‘क्रॅश कोर्स' काढण्याचा सरकारचा विचार आहे.  २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. कमी खर्चात उत्पादन कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कीटकनाशके व्यापाऱ्याला नवीन परवाना काढताना एकदाच साडेसात हजार रुपये द्यावे लागतील. त्यानंतर मात्र पुन्हा रक्‍कम भरावी लागणार नाही. ग्लोबल वार्मिंगमुळे महाराष्ट्रातील आंबा उत्पादन घटत चालले आहे. देशभरात कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा समजून त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला आहे. मागील दोन वर्षांत कीटकनाशक अधिनियम संशोधनासाठी दोन वेळा बदल करण्यात आला होता. आता त्याची वेळेची मर्यादा वाढविण्यात आली असून, ती ३१ जानेवारी २०१९ करण्यात आली आहे. मोहनलाल गुप्ता, रामचरण बोहरा यांची भाषणे झाली. महाराष्ट्र राज्याचे माफदाचे अध्यक्ष प्रकाश कवडे यांनी स्वागत केले. खजिनदार आबासाहेब भोकरे यांनी प्रास्ताविक केले. शलाका भेंडे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद पटेल यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com