agriculture news in Marathi, quality of Rahuri agri university down, Maharashtra | Agrowon

राहुरी कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

पुणे: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कामकाजाचा दर्जा घसरल्यामुळे भारतीय कृषी संशोधन परिषदेने अधिस्वीकृतीमध्ये ‘ब’ दर्जा दिला आहे. विशेष म्हणजे काही महाविद्यालयांमधील सुमार कामामुळे अभ्यासक्रमांना अधिस्वीकृती नाकारली गेली आहे. 

पुणे: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कामकाजाचा दर्जा घसरल्यामुळे भारतीय कृषी संशोधन परिषदेने अधिस्वीकृतीमध्ये ‘ब’ दर्जा दिला आहे. विशेष म्हणजे काही महाविद्यालयांमधील सुमार कामामुळे अभ्यासक्रमांना अधिस्वीकृती नाकारली गेली आहे. 

विद्यापीठ प्रशासन मात्र आमचे कामकाज चांगले चालू असल्याचे मत मांडत आहे. “अधिस्वीकृतीची प्रक्रिया राबविणाऱ्या पथकाकडूनच चुका होतात. काही वेळा नियम बदलतात. त्यामुळे अभ्यासक्रमांना नाकारलेली अधिस्वीकृती काही कालावधीनंतर पुन्हा मिळते. विद्यापीठाचे कुलगुरू मात्र उत्तम काम करीत आहेत,” असा दावा एका संचालकाने केला. आयसीएआरच्या कागदपत्रात नमुद केल्यानुसार राहुरी विद्यापीठाला २.९१ गुण देण्यात आलेले आहे.  तीन पेक्षा कमी गुण असल्यामुळे दर्जा अ न देता ब मिळाला असून पुढील पाच वर्षांसाठी हाच दर्जा राहणार आहे.

राहुरीच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमधील एमएस्सी-कृषी अर्थशास्त्र आणि ीएचडी-  कृषी अर्थशास्त्राला अधिस्वीकृती नाकरण्यात आलेली आहे. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पीएच.डी.-कृषिप्रक्रिया अभियांत्रिकी आणि पीएचडी-कृषी यंत्रशक्ती अभियांत्रिकीला देखील अधिस्वीकृती देण्यात आलेली नाही. पुणे कृषी महाविद्यालयाच्या एमएस्सी- मृदाशास्त्र व कृषी रसायनशास्त्र या अभ्यासक्रमाला अडीच गूण देखील मिळाले नाही. त्यामुळे अधिस्वीकृती दिलेली नाही. पुण्याच्या उद्यानविद्या महाविद्यालयाची आणखी दुरवस्था झाली आहे. केवळ १.८५ गुण मिळाल्याने बीएस्सी- उद्यानविद्या तसेच कराडच्या कृषी महाविद्यालयाला २.१२ गुण मिळाल्याने तेथील बीएस्सी- कृषी अभ्यासक्रमाला अधिस्वीकृती न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली नसली तरी त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण विद्यापीठाला अधिस्वीकृती मिळालेली आहे, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे. “अभ्यासक्रमांना अधिस्वीकृती न मिळाल्यामुळे केवळ त्या विभागापुरता निधी आयसीएआरकडून मिळत नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राशी काहीही संबंध नसतो,” असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, विद्यापीठातील शास्त्रज्ञांना सध्याचे काम पसंत नाही. “अधिस्विकृतीचा ‘ब’ दर्जा विद्यापीठाला मिळणे ही गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या चमकोगिरीची पावती आहे. विद्यापीठाचे प्रशासन सध्या एक कोडाळं चालवित असून त्याचे दीर्घ परिणाम विद्यापीठाच्या वाटचालीवर होतील. देशात आघाडीवर असलेले राहुरी विद्यापीठ आता पहिल्या २५ दर्जेदार कृषी विद्यापीठांच्या यादीत देखील नाही. मात्र, आम्ही पद आणि कार्यक्रमांमध्येच मश्गुल आहोत,” असे हताश उद्‍गार एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने काढले. 

दर्जाचे सोडा; अधिस्वीकृती मिळाली ना?
“कृषी विद्यापीठाला अधिस्वीकृती मिळाल्याचा आनंद आहे. आमचे कामकाज उत्तम असून दर्जा ‘ब’ असो ‘क’ असो; पण विद्यापीठाला अधिस्वीकृती आहे हेच आम्हाला महत्वाचे वाटते,” असे विद्यापीठाच्या प्रशासन विभागाचे म्हणणे आहे.

`ब’ दर्जा म्हणजे काम उत्कृष्ट नाही ः डॉ. देशमुख 
राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख म्हणाले, की राज्याच्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या आमच्यासारख्या अनेक शास्त्रज्ञांनी रक्ताचे पाणी करून विद्यापीठाला वाढविले आहे. देशातील अव्वल विद्यापीठाचा लौकिक शास्त्रज्ञांनीच मिळवून दिला. तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची होती. अधिस्वीकृतीत ‘ब’ दर्जा मिळणे म्हणजे काम उत्कृष्ठ नसल्याचे लक्षण आहे. रिक्त जागांवर भरती आणि साधनसामग्री पुरविल्यास दर्जा सुधारू शकतो.

विद्यापीठाचे काम उत्तम, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही ः डॉ. विश्वनाथा 
विद्यापीठाचा कारभार पूर्वपदावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, की विद्यापीठाला ‘ब’ दर्जा मिळणे किंवा काही अभ्यासक्रमांना अधिस्वीकृती न मिळणे यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. विद्यापीठाचे काम उत्तम असून, विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. अधिस्वीकृतीसाठी गुण देताना काही निकषांची अडचण येते. संशोधन निबंध, अध्यापकवर्ग अशा काही मुद्द्यांमुळे अडचण आलेली आहे. विद्यापीठाचे काम चांगले असल्यामुळेच आम्ही १०१ कोटी रुपयांची मागणी केलेली असताना, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १५१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. शासनाशी बोलून आम्ही इतरदेखील अडचणी दूर करण्याचा सतत प्रयत्न करीत आहोत.

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...