agriculture news in Marathi, Quality wool of Dakhhani sheep , Maharashtra | Agrowon

दख्खनी मेंढीची लाेकरदेखील दर्जेदार
गणेश कोरे
बुधवार, 25 एप्रिल 2018

दख्खनी मेंढीच्या लाेकर संशाेधनासाठी प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, त्याबाबतचा प्रस्ताव वस्त्राेद्याेग विभागाला सादर करण्यात आला आहे. याबाबत दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील सहकार्य केले आहे. प्रकल्पासाठी ब्राझीलच्या संशाेधकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 
- महादेव जानकर, पशुसंवर्धनमंत्री 

पुणे : आॅस्ट्रेलियातील मेरिनाे मेंढीची लोकर शालीनिर्मितीसाठी सर्वोत्तम समजली जाते. याचबरोबरीने आता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर असणाऱ्या दख्खनी मेंढीची लाेकरदेखील पर्यायी उत्पादनांच्या निर्मितीसाठी दर्जेदार असल्याचा शिक्कामाेर्तब इंग्लंडमधील मॅंचेस्टर विद्यापीठाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती शेळी मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.
डॉ. परकाळे म्हणाले, की केंद्र शासनाशी संलग्न असलेल्या ठाणे येथील लाेकर संशाेधन संघटनेला मॅंचेस्टर विद्यापीठाकडून दख्खनी मेंढीच्या लाेकरीच्या दर्जाबाबत पत्र मिळाले आहे. 

 

शेळी-मेंढी विकास महामंडळ, लाेकर संशाेधन संघटना आणि वस्त्राेद्याेग मंत्रालयाच्या वतीने दख्खनी मेंढी संशाेधन, विकास आणि मूल्यवर्धनासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी ४ काेटी ७० लाख रुपयांचा संशाेधन प्रकल्प शासनाला सादर करण्यात आला आहे. दख्खनी मेंढीच्या लाेकरीची उष्णतारोधक क्षमता जगात उपलब्ध असणाऱ्या लाेकरीमध्ये सर्वाेत्तम आहे. जगात आॅस्ट्रेलियातील मेरिनाे मेंढीची लाेकर शाल निर्मितीसाठी सर्वाेत्तम समजली जाते.

मात्र, विद्यापीठाच्या पत्रामुळे पर्यायी उत्पादनासाठी दख्खनी मेंढीच्या लाेकरीचेही महत्त्व वाढले आहे. यामुळे या लाेकरीवर संशाेधन करण्यासाठी लाेकर संशाेधन संघटना आणि मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये संशाेधनासाठी सामंजस्य करार झाला. या संशाेधनासाठी लाेकर उपलब्धतीबाबत महामंडळ संशाेधन प्रकल्पाला मदत करणार आहे.

‘‘संशाेधन प्रकल्पांमधून विविध उत्पादने तयार करण्यात येणार आहेत. दख्खनी मेंढीच्या लोकरीच्या धाग्याची लांबी कमी आणि जाडी जास्त असल्यामुळे यापासून शाली तयार करता येत नाहीत. मात्र, या लोकरीमध्ये उष्णतारोधक गुणधर्म चांगले आहेत. हे गुणधर्म लक्षात घेता या लोकरीचा वापर खेळाडू आणि सातत्याने बर्फाळ प्रदेशात कार्यरत असणाऱ्या सैनिकांचे विशेष गणवेश, शस्त्रक्रिया करताना संसर्ग होऊ नये यासाठी लागणारे उच्च गुणवत्तेचे मास्क निर्मितीसाठी चांगल्या प्रकारे होणार आहे.

वीज बाेर्डसाठी उष्णता शाेषक म्हणून लाेकरीचे पॅड, हिमालयातील घर आणि तंबू बांधणीसाठीच्या घटकांच्यामध्ये या लाेकरीचा वापर शक्य आहे. या संशाेधनामुळे येत्या काळात दख्खनी मेंढीच्या लाेकरीचा वापर वाढणार आहे. यामुळे मागणी आणि दर वाढून मेंढपाळांना देखील आर्थिक फायदा हाेईल.’’ असेही डॉ. परकाळे यांनी सांगितले.   

संशाेधन प्रकल्पामुळे लाेकरीची माेठ्या प्रमाणावर गरज भासणार असल्याने येत्या काळात प्रति किलो १०० रुपयांपर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे. याचा मेंढपाळांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे. लाेकर खरेदीसाठी महामंडळ आणि लाेकर संशोधन संघटनेमध्ये करार करण्यात येणार आहे. याबाबत संघटनेचे संचालक डॉ. ए. के. शर्मा यांनी नुकतीच शेळी मेंढी महामंडळाला भेट देऊन पाहणी आणि चर्चा केली आहे.

लोकर फेकून देण्याचे प्रमाण जास्त
सध्या राज्यात उपलब्ध आकडेवारीनुसार दरवर्षी १ हजार ३८९ टन लाेकरीचे उत्पादन हाेते. याची किंमत सुमारे २५ काेटी रुपये असून, यापैकी केवळ दिड टन लाेकर शेळी मेंढी विकास महामंडळाकडून खरेदी केली जाते. याची किंमत केवळ सुमारे ५० हजार रुपये आहे. महामंडळाकडून हाेणारी लाेकर खरेदी ही लाेकरी धाग्याच्या लांबीनुसार२० ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली जाते. तर काही प्रमाणात लाेकरीचा वापर खत म्हणून केला जाताे. लाेकरीचे मूल्यवर्धन हाेत नसल्याने माेठ्या प्रमाणात लाेकर फेकून देण्याचे प्रमाण जास्त आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...