agriculture news in marathi, Question mark on the sowing of rabbi due to lack of rain | Agrowon

पावसाअभावी रब्बीच्या पेरणीवर प्रश्‍नचिन्ह
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

सांगली ः जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील काही भागात नुकतीच पावसाने हजेरी लावली. पण पुन्हा पावसाने दडी मारली आहे. यामुळे रब्बीचा पेरा कसा होणार अशी चिंता बळिराजाला लागून लागली आहे.

सांगली ः जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील काही भागात नुकतीच पावसाने हजेरी लावली. पण पुन्हा पावसाने दडी मारली आहे. यामुळे रब्बीचा पेरा कसा होणार अशी चिंता बळिराजाला लागून लागली आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू झाली आहे. शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करू लागला आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी शेतीची मशागतीही करून ठेवल्या आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी कशी करायची असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यांत रब्बी हंगामाचे मोठे क्षेत्र आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग पिकाची काढणी आणि मळणी करण्यास वेग आला आहे.

जिल्ह्यात पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे घातलेला खर्चही मिळणासा झाला आहे. आता रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांच्या आशा लागून राहिलेल्या आहेत. परतीचा पाऊस वेळेत झाला तरच रब्बी हंगामातील पिकांची पेरणीसाठी शेतकरी पुढे येतील.

पाणी मागणी अर्जासाठी नोटिसा
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाच्या फलकावर पाटबंधारे विभागाने पाणी मागणीसाठी अर्ज करण्यासाठी नोटिसा लावण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केली तरच योजना सुरू होणार आहे.

टंचाई कृती आराखडा तयार करण्यास सुरवात
जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट येऊ घातले आहे. यामुळे ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यात तातडीने
सन २०१८-१९ चा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यास सुरवात केली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

जत तालुक्‍यात रब्बी हंगामातील पेरण्या सुरू
जत तालुक्‍यात परतीच्या पावसावर रब्बी हंगामात पेरण्या केल्या जातात. तालुक्‍यात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यासाठी नियोजन केले आहे. तर काही ठिकाणी पेरण्या देखील सुरू झाल्या आहेत. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

इतर बातम्या
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
खरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...