agriculture news in Marathi, R. S. Jagtap says Problems of polytechnic will inform to agri Universities, Maharashtra | Agrowon

कृषी विद्यापीठांना तंत्रनिकेतनची समस्या कळवू ः महासंचालक आर. एस. जगताप
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पुणे : कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश न देण्याच्या निर्णयाविरुद्ध संतप्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसमोर द्वारसभा घेतली. ‘‘विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यासाठी सहानुभूतिपूर्वक भूमिका घेण्याबाबत कृषी विद्यापीठांना कळविले जाईल,’’ असे आश्वासन कृषी परिषदेचे महासंचालक आर. एस. जगताप यांनी दिले. 

पुणे : कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश न देण्याच्या निर्णयाविरुद्ध संतप्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसमोर द्वारसभा घेतली. ‘‘विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यासाठी सहानुभूतिपूर्वक भूमिका घेण्याबाबत कृषी विद्यापीठांना कळविले जाईल,’’ असे आश्वासन कृषी परिषदेचे महासंचालक आर. एस. जगताप यांनी दिले. 

कृषी तंत्रनिकेतनच्या १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळच सभा घेतली. यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना श्री. जगताप यांनी, ‘‘या समस्येबाबत परिषदेकडून सकारात्मक सूचना दिल्या जातील,’’ असे आश्वासन दिले. या वेळी परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर व विस्तार संचालक डॉ. विठ्ठल शिर्के उपस्थित होते.  

कृषी तंत्रनिकेतनच्या पदविकाधारकांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने १८ जून २०१५ मध्ये घेतला होता. त्यामुळे आता अचानक हा निर्णय रद्द केल्यामुळे २२७ तंत्रनिकेतनमधील आठ हजार विद्यार्थी अडचणीत आलेले आहेत. कृषी पदवीला व्यावसायिक दर्जा देताना तंत्रनिकेतनला वगळण्यात आले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार आहे, अशी भूमिका विद्यार्थी प्रतिनिधी आनंद लोखंडे यांनी मांडली. 

‘‘शासनाने कृषी पदवीचा दर्जा आणि रचनेत भारतीय कृषी संशोधन परिषद व पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार सुधारणा केली आहे. त्यामुळे श्रेयांक भार वाढले आहेत. मात्र, गुणवत्तेसाठी नव्या बदलानुसार विद्यार्थ्यांनी तयारी करावीच लागेल. विधी पदवीचा कालावधी देखील तीनऐवजी पाच वर्षांचा करताना आधीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला होता,’’ असे श्री. जगताप यांनी स्पष्ट केले. 

‘‘नव्या नियमानुसार कृषी तंत्रनिकेतनच्या चालू तीन तुकड्यांची अडचण झाली आहे. मुळात हा मुद्दा कृषी विद्यापीठांच्या अखत्यारित आहे. तथापि, याबाबत सहानुभूतिपूर्वक काही बाबींचा फेरविचार करण्यासाठी परिषदेकडून सूचना दिल्या जातील,’’ असे श्री. जगताप म्हणाले. 

कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी पूर्वीप्रमाणेच तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना पात्र धरावे, अन्यथा दहा लाख रुपये भरपाई द्यावी, श्रेयांक भारात सूट देण्यासाठी अधिष्ठाता समितीने विचार करावा, जून २०१९ मध्ये तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर पद्धत ठेवावी, अशा मागण्यांचे निवेदन विद्यार्थ्यांनी या वेळी महासंचालकांना दिले.

इतर बातम्या
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
खानदेशात पपईचे पीक जोमात धुळे : यंदा पपईचे पीक कमी पाऊस असतानाही सातपुडा...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावरऔरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
'दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...सोलापूर : ‘‘दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यांतील...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
‘दुष्काळाच्या निकषांसाठी शासनाने...पुणे : कमी पाऊस झाल्यामुळे सरकारला दुष्काळ जाहीर...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...