agriculture news in marathi, Rabbi in Amravati district due to lack of moisture | Agrowon

अमरावती जिल्ह्यातील ‘रब्बी` ओलाव्याअभावी संकटात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे संत्रा उत्पादकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. तापमानात वाढ होत असल्याचा फटकादेखील संत्रा बागांना बसला आहे. रब्बी पिकांच्या लागवडीसाठीदेखील अपेक्षित आर्दता नसल्याने गहू लागवडदेखील प्रभावित होईल.
- राहुल चौधरी, शेतकरी, वरुड, जि. अमरावती.

अमरावती : कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी १ लाख ६८ हजार हेक्‍टरचे क्षेत्र अपेक्षित केले असले तरी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे त्यात घट होण्याचा अंदाज आहे. सिंचन होऊ शकणारे क्षेत्र वगळता जिल्ह्यातील रब्बी क्षेत्र निम्म्यावरच येण्याची भीती आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख ६८ हजार ५४२ हेक्‍टरमध्ये लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्‍यात सर्वाधिक २४ हजार ५५२ हेक्‍टर, मोर्शी तालुक्‍यात २४ हजार ४२८, चिखलदरा ४,३४७, अमरावती ७३८०, भातकुली १५०६५, नांदगाव खंडेश्‍वर ९४३२, चांदूररेल्वे ५९३५, तिवसा ९७३४, वरुड ७१८६, अंजनगावसूर्जी १०९७४, अचलपूर ८६३४, चांदूरबाजार ७९७२ आणि धामनगाव रेल्वे तालुक्‍यात २०६३२ हेक्‍टरचा समावेश आहे. जिल्ह्यात रब्बीचे एक लाख ४१ हजार १८६ हेक्‍टरचे सरासरी क्षेत्र आहे. या तुलनेत गेल्यावर्षी एक लाख ४४ हजार १८२ हेक्‍टरवर रब्‍बीची पेरणी झाली होती.

जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत २४ टक्‍के पाऊस कमी झाला. परिणामी जमिनीत ओलावा कमी असल्याने त्याचा फटका गहू लागवड क्षेत्राला बसेल, असा अंदाज आहे. यावर्षी ५७ हजार हेक्‍टरवर गव्हाचे नियोजन आहे. जमिनीतील अत्यल्प आर्दता, कमी पर्जन्यमानामुळे विहिरींनी गाठलेला तळ, आदी कारणांमुळे गव्हाचे क्षेत्र निम्म्यावरच येण्याची
शक्‍यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...