जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात १५ जानेवारीअखेर अवघे नऊ टक्के कर्ज वितरण झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उर्वरित अडीच महिन्यांत किती उद्दिष्ट पूर्ण होणार हे पाहावे लागणार आहे.
सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात १५ जानेवारीअखेर अवघे नऊ टक्के कर्ज वितरण झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उर्वरित अडीच महिन्यांत किती उद्दिष्ट पूर्ण होणार हे पाहावे लागणार आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १०१२.८८ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी १५ जानेवारीअखेर १०० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. साडेतीन महिन्यांत अवघे नऊ टक्के कर्ज वितरण झाले आहे. रब्बी हंगामात पीककर्ज वितरणात सर्व बँकांची धोरणे उदासीन आहेत. खरिपात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र रब्बीत पीक कर्ज वितरणाकडे बँकांनी दुर्लक्ष केले असल्याने वितरणाचा आकडा कमी झाला आहे.
राष्ट्रीयीकृत बॅंकांना ४३९ कोटी ८० लाखांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून, यापैकी ३२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सात टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांत बॅंक ऑफ महाराष्ट्रने सर्वाधिक ११ कोटी ३६ लाखांचे पीककर्ज वितरण केले आहे. या बँकेने १२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात २० राष्ट्रीयीकृत बँकांपैकी १० बँकांनी शून्य टक्के कर्ज वाटप केले आहे. खासगी बॅंकांनी एकूण उद्दिष्टापैकी १९ टक्के म्हणजेच २४ कोटी ४ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ४३ कोटी ९९ लाख रुपयांचे पीककर्ज वितरण केले आहे. जिल्हा बॅंकेने एकूण उद्दिष्टापैकी आठ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. रब्बी कर्ज वितरण सुरू होऊन साडेतीन महिने उलटले असून, कर्ज वितरण करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. उर्वरित कालवधीत किती कर्ज वाटप होईल हे पाहावे लागणार आहे.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पाठ
जिल्ह्यातील अनेक भागांस तीव्र दुष्काळाच्या झळा बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्याकडे पाठ फिरवली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पुर्वीचेच कर्ज थकीत असल्याने नवीन कर्ज घेतले जात नाही. तसेच पीक कर्जमाफी बाबतच्या चर्चांमुळे अनेक शेतकऱ्यांचा कर्ज न भरण्याकडे कल वाढला आहे. पीक कर्जाबाबत बॅँकाची धोरणे उदासीन असल्याने एकूण कर्ज वितरणावर परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे.
- 1 of 348
- ››