agriculture news in marathi, rabbi crop sowing status, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ८९ टक्के पेरणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017
बुलडाणा ः कमी पावसासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात यंदा रब्बी हंगाम रखडला अाहे. प्रामुख्याने गव्हाचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले अाहे. दुसरीकडे हरभरा पिकाची लागवड वाढली अाहे. खरिपात बसलेली झळ रब्बी उत्पादनाच्या माध्यमातून भरून काढण्यासाठी या हंगामाकडे अाशेने बघितले जात अाहे.
 
बुलडाणा जिल्ह्यात अाॅक्टोबरपासून रब्बी हंगामाला सुरवात झाली होती. अाता पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या अाहेत. या वर्षी अातापर्यंत झालेल्या पेरणीचा अंदाज घेता ८९ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांचा पेरा झाला आहे.
 
बुलडाणा ः कमी पावसासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात यंदा रब्बी हंगाम रखडला अाहे. प्रामुख्याने गव्हाचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले अाहे. दुसरीकडे हरभरा पिकाची लागवड वाढली अाहे. खरिपात बसलेली झळ रब्बी उत्पादनाच्या माध्यमातून भरून काढण्यासाठी या हंगामाकडे अाशेने बघितले जात अाहे.
 
बुलडाणा जिल्ह्यात अाॅक्टोबरपासून रब्बी हंगामाला सुरवात झाली होती. अाता पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या अाहेत. या वर्षी अातापर्यंत झालेल्या पेरणीचा अंदाज घेता ८९ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांचा पेरा झाला आहे.
 
त्यात सर्वाधिक ९१ हजार १३६ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याचे अाहे. जिल्ह्याचे हरभरा पिकाखाली सरासरी क्षेत्र प्रत्यक्षात ७३ हजार ९१० हेक्टर असताना, या वेळी पेरणी वाढून १२३ टक्क्यांपर्यंत आताच पोचली अाहे. यात अाणखी वाढ होण्याची शक्यता अाहे. जिल्ह्यात दुसरे महत्त्वाचे पीक गव्हाचे समजले जाते. रब्बीत या पिकाचे ५२ हजार ९४० हेक्टर सरासरी क्षेत्र अाहे. या वर्षी गव्हाचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात घसरले अाहे. केवळ १५ हजार ५०० हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. सरासरीच्या केवळ २९ टक्के एवढेच हे क्षेत्र अाहे. 
 
पाण्याची पातळी खालावणे, दरवर्षी उत्पादकता घटणे, उत्पादन खर्चात झालेली वाढ अादी कारणांमुळे शेतकरी गव्हाकडे पाठ फिरवून हरभऱ्यासारख्या पिकाकडे वळाले अाहेत. जिल्ह्यात दरवर्षी रब्बी ज्वारीचे क्षेत्र बऱ्यापैकी टिकून राहलेले अाहे. या वर्षीही ज्वारीची लागवड नऊ हजार हेक्टरवर पोचले अाहे. प्रत्यक्षात ९४१२ हेक्टरवर पेरणी झाली अाहे. मक्याचीही तीन हजार हेक्टरपर्यंत पेरणी झाली अाहे. 
 
या वर्षात बुलडाणा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने प्रकल्प भरू शकलेले नाहीत. परिणामी पाणीपातळीतसुद्धा घट अालेली अाहे. प्रकल्पांमध्ये असलेले पाणी पिण्यासाठी अारक्षित ठेवण्यात अाले असून, सिंचनासाठी पाणीउपशावर प्रशासनाने निर्बंध घातले अाहेत.
 
रब्बीची लागवड सुरू झाली त्या काळात जमिनीतील अोल घटत होती. या सर्वच बाबींचा लागवडीला फटका बसला. अातापर्यंत एक लाख १९ हजार १६४ हेक्टरवर पेरणी अाटोपली अाहे. सरासरीच्या ८९ टक्के हे क्षेत्र अाहे. 
पिकनिहाय पेरणीक्षेत्र (हेक्टर) ः ज्वारी ९४१२, मका २९८३, गहू १५,५००, हरभरा ९१, १३६, सूर्यफूल १०, करडई १०३.

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...