agriculture news in marathi, rabbi crop sowing status, jalgaon,maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याची २९ हजार हेक्‍टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017
रब्बी पिकांची पेरणी जोमात सुरू आहे. हरभरा क्षेत्र अधिक असल्याने बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध केले आहेत. तसेच खतेही उपलब्ध असून, पुढील चित्र चांगले राहील, अशी अपेक्षा आहे. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव.
जळगाव : जिल्ह्यात हरभऱ्याच्या पेरणीला वेग येत आहे. आजघडीला एकूण २९ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली असून, हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांची मिळून एक लाख सहा हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पुढील आठवड्यात पेरणीला आणखी वेग येणार असल्याची माहिती आहे.
 
जिल्ह्यात एक लाख ८४ हजार हेक्‍टरवर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होईल, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यादृष्टीने खते, बियाणे यासंबंधीची व्यवस्था शासकीय संस्थांच्या मदतीने करण्यात आली. यात हरभऱ्याचे बियाणे अधिकचे मागविण्यात आले. कारण जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी पाच हजार हेक्‍टर अधिक होईल, अशी शक्‍यता आहे. हरभऱ्याची इतर पिकांच्या तुलनेत सर्वाधिक ७५ हजार हेक्‍टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे. ज्वारीची ३३ हजार हेक्‍टरवर पेरणी होईल. गव्हाच्या २८ हजार हेक्‍टरवर पेरणीचा अंदाज आहे. 

 

जिल्ह्यात दसरा सणानंतर झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले. दिवाळीनंतर थंडीही वाढू लागली. ज्या शेतकऱ्यांना हरभरा, दादर (ज्वारी) पेरणीबाबत फारसा आशावाद नव्हता त्यांच्या आशा परतीच्या पावसामुळे पल्लवीत झाल्या. परिणामी हरभरा व दादरची पेरणी दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर वेगात सुरू होती. 

हरभऱ्यानंतर दादरचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यानंतर गव्हाचे क्षेत्र असून, हवे तसे पाणीसाठा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी हरभरा पेरणीवर भर दिलेला दिसतो. जिल्ह्यात काळीकसदार जमीन असलेल्या भागात हरभऱ्याची पेरणी जोमात सुरू आहे. रावेर, यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, अमळनेरच्या तापीकाठावरील भागात दादर, हरभरा पेरणी पूर्ण होत आली आहे. काही ठिकाणी हरभरा पेरणी अजूनही सुरू आहे. गव्हाची पेरणीदेखील सुरू झाली आहे.
 
जिल्ह्यात गव्हाच्या तुलनेत मक्‍याचे क्षेत्रही वाढू लागले आहे. त्याची जिल्हाभरात जवळपास २१ हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर भागातील अनेक शेतकऱ्यांनी तर सूक्ष्म सिंचनावर मका लागवड केली आहे. जुनारी केळी, कडधान्य व तृणधान्य पिकांमधून रिकाम्या झालेल्या क्षेत्रात लागवड सुरू आहे. मका लागवड अगदी फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात सुरू राहील.

इतर ताज्या घडामोडी
कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रणराज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट...
अधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...
कर्जमाफीच्या २१ लाख शेतकऱ्यांचे खाते '...यवतमाळ : कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे....
नगर जिल्ह्यात `नरेगा’च्या कामांवर...नगर : मजुरांना रोजगार मिळावा म्हणून राबवल्या...
वऱ्हाडात कांदा बिजोत्पादनाला गारपिटीचा...अकोला ः कांदा बिजोत्पादनाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या...
हमीभाव : धूळफेकीचे चक्र पूर्ण सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने सत्तेवर...
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी :...दीडपट हमीभावाची सरकारची घोषणा ही शुद्ध बनवाबनवी...
उत्पादन खर्चाबद्दल खुलासा करावा : डॉ....केंद्र सरकारने आगामी खरिपात सर्व अघोषित पिकांसाठी...
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
गारपीटग्रस्त केळी बाग सुधारणेच्या...अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  केळी पिकाचे कमी-...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला,...ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी...
पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढपुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये...