agriculture news in marathi, rabbi crop sowing status maharashtra | Agrowon

राज्यात रब्बीची ५२ टक्के पेरणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017
पुणे : राज्यात रब्बी पिकांचा पेरा आतापर्यंत ५२ टक्क्यांपर्यंत गेला आहे. बेमोसमी पावसामुळे ज्वारी व गव्हाला फायदा होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
 
रत्नागिरी, नाशिक, पुणे तसेच मराठवाड्यातील काही भागात बेमोसमी पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ३.३ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात रब्बीची एकूण ५४.७५ लाख हेक्टरवर पेरणी होते. शुक्रवारपर्यंत (ता.१७) यापैकी २८.३५ लाख हेक्टरवर म्हणजे ५२ टक्के पेरणी झालेली आहे.
 
पुणे : राज्यात रब्बी पिकांचा पेरा आतापर्यंत ५२ टक्क्यांपर्यंत गेला आहे. बेमोसमी पावसामुळे ज्वारी व गव्हाला फायदा होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
 
रत्नागिरी, नाशिक, पुणे तसेच मराठवाड्यातील काही भागात बेमोसमी पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ३.३ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात रब्बीची एकूण ५४.७५ लाख हेक्टरवर पेरणी होते. शुक्रवारपर्यंत (ता.१७) यापैकी २८.३५ लाख हेक्टरवर म्हणजे ५२ टक्के पेरणी झालेली आहे.
 
खरीप ज्वारी, बाजरी, सोयबीन, भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. तूर मात्र अनेक ठिकाणी वाढीच्या तसेच काही ठिकाणी फुलोरा ते शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. कापसाची वेचणी अजूनही सुरू आहे. 
 
विविध रबी पिकांच्या पेऱ्याची स्थिती बघता सर्वात जास्त आघाडी हरभऱ्याने घेतली आहे. राज्यात १३ लाख हेक्टरवर हरभरा पीक घेतले जाते. गेल्या हंगामात याच कालावधीत साडे नऊ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता. हाच पेरा यंदा आतापर्यंत साडे दहा लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. रबी ज्वारीचा पेरा मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी दिसतो आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत शेतकऱ्यांनी साडेसोळा लाख हेक्टरवर ज्वारीचा पेरा केला होता. यंदा मात्र आतापर्यंत साडेचौदा लाख हेक्टरच्या आसपास पेरा झालेला आहे. 

 

कीडरोगाबाबत कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त असल्याचे म्हटले आहे. या जिल्ह्यातील २०५ गावांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
 
धुळे जिल्ह्यातील चार गावांमध्ये, नंदूरबारमधील दोन, तर जळगावमधील ९ गावांमध्ये कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. नगर जिल्ह्यातील ४५, जालन्यातील ७९, बीडमधील ७८, परभणीतील १२ आणि नांदेड जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये शेंदरी बोंडअळी आढळून आली आहे. तसेच हिंगोलीतील चार, अमरावतीतील ५८, वाशीममधील २५, अकोल्यातील १०१ गावांमध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
 
या भागांमधील शेतकऱ्यांना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पीक संरक्षणासाठी सल्ला दिला जात असल्याचे आढळल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...