agriculture news in marathi, rabbi crop sowing status, marathwada, maharashtra | Agrowon

मराठवाड्यात १७ लाख ३१ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017
औरंगाबाद  : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीसह गव्हाचे क्षेत्र घटले आहे. दुसरीकडे यंदा मक्‍याचे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत विस्तारले आहे. यंदा मराठवाड्यात १८ लाख ७ हजार हेक्‍टर या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १७ लाख ३१ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 
औरंगाबाद  : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीसह गव्हाचे क्षेत्र घटले आहे. दुसरीकडे यंदा मक्‍याचे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत विस्तारले आहे. यंदा मराठवाड्यात १८ लाख ७ हजार हेक्‍टर या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १७ लाख ३१ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 
गतवर्षी रब्बी हंगामात १८ लाख ४४० हेक्‍टर इतके सर्वसाधारण क्षेत्र गृहीत होते. त्यातुलनेत २० लाख ८९ हजार हेक्‍टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली होती. यंदा मात्र खरीप पूर्णत: हातचा गेला, परतीच्या पावसाने जमिनीतील ओल व वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे रब्बीची आशा वाढली. मात्र असे असतानाही डिसेंबर अर्धा संपूनदेखील सर्वसाधारण क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली नाही.
 
गतवर्षी संपूर्ण मराठवाड्यात जवळपास ८ लाख १७ हजार हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यंदा मात्र ६ लाख हेक्‍टरवरच पेरणी झाली. गतवर्षी गव्हाची ३ लाख १७ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा डिसेंबरच्या मध्यापर्यंत २ लाख २६ हजार हेक्‍टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. गतवर्षी रब्बी मक्‍याची ६७ हजार ४०० हेक्‍टरवर पेरणी झाली होती.
 
यंदा ३६ हजार ९८० हेक्‍टरवर रब्बी मक्‍याची पेरणी झाली आहे. यंदा रब्बी मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ६९७ हेक्‍टर गृहीत होते, त्या तुलनेत मक्‍याची पेरणी जास्त क्षेत्रावर झाल्याचे दिसते आहे. गतवर्षी इतर गळीतधान्यांची पेरणी ६२ हजार हेक्‍टरवर झाली होती. यंदा गळीतधान्यांची पेरणी केवळ ३१ हजार १६८ हेक्‍टरवरच अडली आहे. 
 
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा ८ लाख ३३ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत २ लाख १८ हजार हेक्‍टर; तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड व हिंगोली या पाच जिल्ह्यांत ६ लाख १४ हजार हेक्‍टरचा समावेश आहे. गतवर्षी मराठवाड्यात ८ लाख १८ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. 

औरंगाबाद, परभणी, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांत अजूनही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अपेक्षित रब्बी पेरणीचा टप्पा पार झालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७९, उस्मानाबाद जिल्ह्यात ८६, परभणी जिल्ह्यात ७२  तर हिंगोली जिल्ह्यात ८५ टक्‍के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. जालना, बीड, लातूर व नांदेड जिल्ह्यांत मात्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन रब्बी पेरणी झाली आहे.

पीकनिहाय झालेली पेरणी (क्षेत्र हेक्‍टरमध्ये) ः रब्बी तृणधान्ये ः ८,६५,६०१, रब्बी कडधान्ये ः ८,३४,७९९, रब्बी गळीतधान्ये ः ३१,१६८

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...