agriculture news in marathi, rabbi crop sowing status, marathwada,maharashtra | Agrowon

रब्बीचा दोन लाख ४१ हजार हेक्‍टरवर पेरा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017
औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सर्वसाधारण ६ लाख ५२ हजार हेक्‍टरपैकी २ लाख ४१ हजार ३३१ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणीचा टक्‍का अजूनही ३७ टक्‍क्‍यांच्या पुढे सरकला नसून पेरणीची गती संथच आहे. 
 
औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सर्वसाधारण ६ लाख ५२ हजार हेक्‍टरपैकी २ लाख ४१ हजार ३३१ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणीचा टक्‍का अजूनही ३७ टक्‍क्‍यांच्या पुढे सरकला नसून पेरणीची गती संथच आहे. 
 
औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिले आहे. त्यापाठोपाठ रब्बी ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. तीनही जिल्ह्यांत रब्बी ज्वारीच्या सर्वसाधारण ३ लाख ९२ हजार ९६९ हेक्‍टर क्षेत्रापैकी १ लाख  ५५ हजार ३५६ हेक्‍टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या ३९ टक्‍के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. गव्हाच्या सर्वसाधारण १ लाख ९ हजार ७५८ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत केवळ १० टक्‍के अर्थात ११ हजार ९३५ हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.
 
तीनही जिल्ह्यांत रब्बी मक्‍याचे सर्वसाधरण क्षेत्र १२ हजार ४६३ हेक्‍टर असून, त्यातुलनेत ४७८२ हेक्‍टरवर मक्‍याची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १७ हजार ४२८ हेक्‍टर असून, इतर रब्बी पिकाच्या तुलनेत आजवर सर्वाधिक ५७ टक्‍के अर्थात ६७ हजार ३० हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. रब्बी सूर्यफुलाचीही २२७४ हेक्‍टरवर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. 
 
औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सात तालुक्‍यांत हरभऱ्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. यामध्ये सिल्लोड, जाफ्राबाद, बदनापूर, आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई व केज या तालुक्‍यांचा समावेश आहे. 

इतर बातम्या
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...