agriculture news in marathi, rabbi crop sowing status, pune regaion, maharashtra | Agrowon

पुणे विभागात रब्बीची पावणेसहा लाख हेक्‍टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
पुणे : थंडी वाढू लागल्याने पुणे विभागात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. सध्या हरभरा, गहू पेरणीने चांगलाच वेग घेतला आहे. विभागात आत्तापर्यंत सरासरी १७ लाख ३६ हजार ७० हेक्‍टर क्षेत्रापैकी ५ लाख ८५ हजार २९० हेक्‍टरवर म्हणजेच ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
पुणे : थंडी वाढू लागल्याने पुणे विभागात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. सध्या हरभरा, गहू पेरणीने चांगलाच वेग घेतला आहे. विभागात आत्तापर्यंत सरासरी १७ लाख ३६ हजार ७० हेक्‍टर क्षेत्रापैकी ५ लाख ८५ हजार २९० हेक्‍टरवर म्हणजेच ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
विभागात तृणधान्याचे सरासरी क्षेत्र १५ लाख ३० हजार ५३० हेक्‍टर आहे. त्यापैकी आत्तापर्यंत पाच लाख ३१ हजार ७२० हेक्‍टर म्हणजेच ३४.७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. विभागात सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. विभागात ज्वारीची पाच लाख १ हजार ३८० हेक्‍टरवर म्हणजेच ३८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ गहू, मक्‍याची पेरणी झाली आहे.
 
कडधान्याचे सरासरी क्षेत्र एक लाख ७३ हजार ३८० हेक्‍टर आहे. त्यापैकी ५१ हजार ८४० हेक्‍टर म्हणजेच २९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गळीत धान्याचे सरासरी क्षेत्र ३२ हजार १६० हेक्‍टर आहे. त्यापैकी १७३० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 
 
विभागातील नगर जिल्ह्यात मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी वापसा आलेला आहे. त्या ठिकाणी पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारी, मका व हरभरा पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. नगर, कर्जत, पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, नेवासा तालुक्‍यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. शेवगाव, पाथर्डी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्‍यात अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली आहे.
 
पुणे जिल्हयातील मावळ, मुळशी तालुक्‍यात हळव्या भातपिकाची काढणी सुरू झाली आहे. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड तालुक्‍यात रब्बी हंगामातील ज्वारी, मका पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. गहू व हरभरा पिकांच्या पेरणीस सुरवात झाली आहे. बारामती तालुक्‍यात सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्‍यात अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली आहे.  मुळशी, भोर, मावळ, वेल्हे तालुके रब्बी पेरणीपासून दूर आहेत.  
 
सोलापूर जिल्ह्यात खरीपातील तूर शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, मका व हरभरा वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्‍यात रब्बी ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. त्याखालोखाल हरभऱ्याची पेरणी झाली असल्याचे चित्र आहे. 
 
जिल्हानिहाय झालेली रब्बीची पेरणी (हेक्‍टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्केवारी 
नगर ६,४५,१०० २,३९,७६० ३७.२ 
पुणे ४,०४,०८० १,००,३०० २४.८ 
सोलापूर ६,८६,८९० २,४५,२३० ३५.७ 

इतर ताज्या घडामोडी
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून...
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...