agriculture news in marathi, rabbi crop sowing status, pune regaion, maharashtra | Agrowon

पुणे विभागात रब्बीची १८ लाख हेक्‍टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे  ः रब्बी हंगामातील पेरण्यांचा कालावधी संपला आहे. पुणे विभागात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र १७ लाख ३६ हजार ४८ हेक्‍टर आहे. यंदा १८ लाख १३ हजार ६५४ हेक्‍टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे  ः रब्बी हंगामातील पेरण्यांचा कालावधी संपला आहे. पुणे विभागात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र १७ लाख ३६ हजार ४८ हेक्‍टर आहे. यंदा १८ लाख १३ हजार ६५४ हेक्‍टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षीही रब्बी हंगामात शंभर टक्के पेरणी झाली होती. यंदा १०४ टक्के पेरणी झाली असून उत्पादनात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी ज्वारी पीक दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून लवकर पेरणी झालेल्या ज्वारी पिकाच्या काढणीस सुरवात झाली आहे. गहू पीक लोंब्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक घाटे पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी या पिकाची काढणी सुरू आहे. काही तालुक्‍यांत हरभरा पिकावर अत्यल्प प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारीचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. लवकर पेरणी झालेल्या ज्वारी पिकाच्या काढणीस सुरवात झाली आहे. गहू पीक ओंब्यामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक घाटे पक्वतेच्या अवस्थेत आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील तूर पिकाची काढणी संपत आली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पीक दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी अल्पप्रमाणात काढणीस सुरवात झाली आहे. काही तालुक्‍यांत हरभरा पिकावर अत्यल्प प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला असून त्यावर उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...