agriculture news in marathi, rabbi crop sowing status, sangli,maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात रब्बीची ४४ टक्के पेरणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017
सांगली : जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग आला असून आत्तापर्यंत ४४ टक्के पेरणी झाली आहे. जत तालुक्‍यात ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. मात्र, तेलवर्गीय करडई, सूर्यफूल या पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
सांगली : जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग आला असून आत्तापर्यंत ४४ टक्के पेरणी झाली आहे. जत तालुक्‍यात ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. मात्र, तेलवर्गीय करडई, सूर्यफूल या पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र २ लाख ६६ हजार ९०७ हेक्‍टर आहे. त्यापैकी आजअखेर १ लाख १७ हजार ९६० हेक्‍टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. गेल्या महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांची काढणी उशिरा सुरू झाली. यामुळे रब्बीच्या पेरण्यादेखील उशिरा प्रारंभ झाला. वाळवा, पलूस तालुक्‍यात सोयाबीनची काढणी सुरू आहे. शिराळा तालुक्‍यात भाताची अद्यापही काढणी सुरू झालेली नाही. त्यामुळे या तिन्ही तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरवात केली नसल्याचे चित्र आहे. येत्या चार दिवसांत उर्वरित सोयाबीनची काढणी पूर्ण होईल त्यानंतर रब्बी पिकांच्या पेरणीला अधिक गती येईल. 
 
जत तालुक्‍यात खरीप हंगाम वाया गेला होता. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीसाठी तयारी करून ठेवली होती. शेतकरी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करीत होते. यामुळे गेल्या महिन्यात झालेल्या पावसावर जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या. जत तालुक्‍यात ज्वारीचे क्षेत्र ८८ हजार ९४० हेक्‍टर आहे, त्यापैकी ५३ हजार ३७१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...
मंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला?जळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता...
‘ईव्हीएम’चा विजय असो : छगन भुजबळनाशिक  : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये...
सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंना...सातारा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...