agriculture news in marathi, rabbi jowar sowing planning, pune, maharashtra | Agrowon

राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी लागवड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पौष्टिक धान्य म्हणून ज्वारीचा प्रसार केला तरच राज्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव वाढतील. भाव चांगले मिळू लागल्यास ज्वारीचे उत्पादनदेखील वाढेल.
- विजय घावटे, कृषी विस्तार संचालक, कृषी आयुक्तालय.

पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे पौष्टिक धान्य म्हणून राज्यात रब्बी हंगामात २७ लाख हेक्टरवर ज्वारीचा पिकाची लागवड तसेच जनजागृती करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे, अशी माहिती कृषी संचालक विजय घावटे (विस्तार) यांनी दिली.

रब्‍बी हंगामात ज्वारी हे प्रमुख पीक असले तरी कृषी विभागाने लागवड सल्ला किंवा बियाणे उपलब्धता वगळता पौष्टिक पीक म्हणून प्रसाराचे काम यापूर्वी केलेले नाही. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून ज्वारीला पौष्टिक पीक म्हणून पुढे आणण्यासाठी कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. अन्न सुरक्षा अभियानातून  ज्वारीसाठी राज्याच्या काही भागांत प्रात्यक्षिके घेतली जातील. मात्र, पौष्टिक धान्य म्हणून ज्वारीला राज्याच्या  सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत आणून स्वस्तात ज्वारीची विक्री व्हावी, हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी केंद्रांची संख्या जास्त असावी, असादेखील प्रयत्न केला जाईल, असे श्री. घावटे यांनी स्पष्ट केले.

राज्यात अन्न सुरक्षा अभियान राबविण्यासाठी २४० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यातून यंदा गहू, धान, कडधान्ये व तसेच पौष्टिक धान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पौष्टिक धान्य म्हणून ज्वारीचा प्रसार कोणत्या पद्धतीने करावा यासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा घेतली जाणार आहे. यात प्रक्रिया उद्योजक, शेतकरी, कृषी अधिकारी यांचा समावेश असेल, असे श्री. घावटे म्हणाले.

दरम्यान, राज्यात सर्वांत जास्त रब्बी ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या पुणे विभागात पेरण्या सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत ५५० हेक्टरवर ज्वारीचा पेरा झालेला होता. ज्वारीला उसापेक्षा कमी पाणी आणि साखरेचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे चारा आणि धान्य विक्री अशा दुहेरी हेतूने लागवड केली जाते. काही साखर कारखान्यांनी इथेनॉलसाठी ज्वारी लागवड वाढविण्याचा सल्ला दिला आहे.
हेक्टरी ८० टन उत्पादन देणाऱ्या इथेनॉलनिर्मितीस उपयुक्त ठरणाऱ्या वाणाचा प्रसार करण्यात आला आहे. राज्यातदेखील या वाणाचे प्रयोग मराठवाड्याच्या काही भागात घेतले जात आहेत.
 

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...