agriculture news in Marathi, rabbi planting over 38 lack hectors in the country, Maharashtra | Agrowon

देशात रब्बीची पेरणी ३८ लाख हेक्टरवर
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली ः भारतातील बऱ्याच भागांत परतीच्या मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पेरणीला पोषक स्थिती असून पेरणीच्या कामाने वेग घेतला आहे. मागील आठवड्यापर्यंत देशात रब्बीची ३८.६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे. 

नवी दिल्ली ः भारतातील बऱ्याच भागांत परतीच्या मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पेरणीला पोषक स्थिती असून पेरणीच्या कामाने वेग घेतला आहे. मागील आठवड्यापर्यंत देशात रब्बीची ३८.६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे. 

देशात यंदा सरासरी ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र सरासरीच्या कमी ९५ टक्केच पाऊस झाला; परंतु सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील अनेक भागा़ंत जोरदार पाऊस झाला. सुरवातीला ज्या भागात पावसाने दांडी मारली होती तेथेही नदी, नाले भरून वाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा वाढल्या होत्या.    

देशातील अनेक भागांत उशिरा झालेल्या पावसाने जमिनीतील ओलावा वाढला होता. पेरणीला पोषक वातारण असल्याने शेतकऱ्यांनी लागवडीची कामे फूर्ण केली. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. देशातील रब्बी पेरणी आॅक्टोबरमध्ये सुरू होते आणि फेब्रुवारीमध्ये पिकांची काढणी होते. यंदा पेरण्या वेळेवर सुरू झाल्याने उत्पानात वाढ होण्याचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे. 

कडधान्य पेरणी आघाडीवर 
कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३८.६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक ११ लाख हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली. तेलबीयांची पेरणी ९ लाख हेक्टरवर; तर भाताची पेरणी ४ लाख ६० हजार हेक्टरवर झाली आहे. ज्वारी, बाजरी आणि रागीची ४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा रब्बीच्या पेरण्या वेळेवर सुरू झाल्याने पेरणी क्षेत्र आणि उत्पादन वाढेल, असा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

पाऊस रब्बीला पोषक ः पटनायक
देशातील अनेक भागांत परतीचा जोरदार पाऊस झाला; तसेच काही भागांमध्ये उशिराचा पाऊस सुरू आहे. हा पाऊस रब्बी पिकांना पोषक ठरणार असून, त्यामुळे देशात रब्बी लागवड वाढण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय कृषी सचिव शोभना के. पटनायक यांनी सा़ंगितले.

‘‘देशात यंदा रब्बी हंगामात मागील वर्षापेक्षा जास्त उत्पादन होईल अशी आशा आहे. २०१६-१७ मध्ये देशात रब्बी हंगामात १३७.२ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. उशिरा झालेल्या पावसाने पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने खरिपातील उत्पादनाचा आधी जाहीर केलेला अंदाज खरा ठरण्याची शक्यात कमी आहे. यंदा खरीप हंगामात १३४.६७ दशलाख टन अन्नधान्य उत्पाद होईल असा अंदाज आहे. मागील वर्षी २०१६-१७ च्या खरिपात विक्रमी १३८.५२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. रब्बी हंगामात कडधान्यांची जास्तीत जास्त लागवड व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जेणेकरून डाळी आयात करण्याची गरज भासणार नाही. मागील वर्षासारखी डाळींच्या किमतीत यंदा जास्त चढउतार होणार नाही. यंदा सरकारकडे कडधान्यांचा मुबलक साठा आहे,’’ असेही पटनायक म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...