agriculture news in marathi, Rabbi is proposed at 23 lakh hectare in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात २३ लाख हेक्‍टरवर रब्बी प्रस्तावित
संतोष मुंढे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २३ लाख ७० हजार १०० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील ९ लाख १३ हजार तर लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील १४ लाख ५७ हजार १०० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २३ लाख ७० हजार १०० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील ९ लाख १३ हजार तर लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील १४ लाख ५७ हजार १०० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

औरंगाबाद कृषी विभागांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५२ हजार हेक्‍टर आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत गतवर्षीच्या रब्बी हंगामात ७ लाख ९५ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली होती. दुसरीकडे लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ११ लाख ४८ हजार ४३० हेक्‍टर आहे. त्या तुलनेत गतवर्षीच्या रब्बी हंगामात १२ लाख ९४ हजार ७४९ हेक्‍टरवर रब्बीची प्रत्यक्ष पेरणी झाली होती.

दरम्यान पाऊस आणि गतवर्षी झालेल्या प्रत्यक्ष पेरणीची आकडेवारी लक्षात घेता यंदा लातूर कृषी विभागाअंतर्गत पाचही जिल्ह्यांत १३ टक्‍के क्षेत्रवाढ गृहीत धरून यंदा १४ लाख ५७ हजार १०० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित केली आहे. दुसरीकडे औरंगाबाद कृषी विभागाअंतर्गत तीनही जिल्ह्यांत रब्बी क्षेत्रात १४.८८ टक्‍के वाढ गृहीत धरून यंदा ९ लाख १३ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात घट होण्याची शक्यता
मराठवाड्यात यंदा प्रस्तावित एकूण रब्बी क्षेत्रात परभणी जिल्ह्यात वाढ होणे कृषी विभागाला अपेक्षित नाही. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ४ टक्‍के घट येण्याची शक्‍यता कृषी विभागाला आहे. पावसाचा प्रदीर्घ खंड व पाणीसाठ्यांची अवस्था पाहून हे नियोजन लातूर कृषी विभागाकडून प्रस्तावित केले गेले आहे.

लातूर विभागात सरासरी ७२ टक्केच पाऊस
लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत यंदा २५ सप्टेंबर अखेरपर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या सरासरी ७२ टक्‍केच पाऊस पडला. त्यामध्ये १८ जून ते २३ जुलै व २० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर असा एकूण ७३ दिवस पावसाचा खंड पडला होता. पडलेल्या पावसामध्ये विभागात सरासरी ३६ दिवसच पाऊस पडला. त्यामध्ये लातूर जिल्ह्यात ३५ दिवस, उस्मानाबाद जिल्ह्यात ३६ दिवस, नांदेड जिल्ह्यात ३९ दिवस, परभणी जिल्ह्यात ३१ दिवस तर हिंगोली जिल्ह्यात केवळ ३९ दिवस पाऊस पडला. याचा थेट परिणाम रब्बीच्या क्षेत्र नियोजनावर झाला आहे.
 

जिल्हा  सरासरी क्षेत्र  प्रस्तावित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
औरंगाबाद १ लाख ८९ हजार २ लाख १९ हजार
जालना  १ लाख ५३ हजार २ लाख ६५ हजार
बीड ३ लाख १० हजार ४ लाख २९ हजार
लातूर १ लाख ७१ हजार ३ लाख ३३ हजार
उस्मानाबाद ४ लाख ९ हजार ४ लाख ८३ हजार
नांदेड १ लाख ३३ हजार २ लाख २५ हजार
परभणी २ लाख ८८ हजार २ लाख ८८ हजार
हिंगोली १ लाख ४५ हजार १ लाख २७ हजार

 

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देणार?आज घडीला कोरडवाहू शेतकरी मित्रांना एक विवंचना...
उद्विग्न शेतकरी; उदासीन बॅंकामृग नक्षत्र चार दिवस बरसल्यानंतर पावसाने उघडीप...
सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक...पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते...
कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट गुंतवणुकीसाठी...नवी दिल्ली : भारतातील कृषिक्षेत्रात काॅर्पोरेट...
यवतमाळात दोन दिवसांत ३० कोटींचे पीककर्ज...यवतमाळ : पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी...
पीककर्ज वाटपात गोंधळचअकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण...
अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...
खरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल...
शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे...सातारा : जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने...
कीटकनाशक कक्षाला कमकुवत ठेवण्यात ‘यश’पुणे : विषबाधा, अप्रमाणित मालाचा पुरवठा यामुळे...
...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागतेयवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला...
बचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथचिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा...
फळबागेतून माळरान झाले हिरवेगारमिरज शहरात वकिली करताना चंद्रशेखर शिवाजीराव...
चांगला निर्णय; पण उशिरानेच!बीटीबाबत बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण...
प्रवास त्रिशुळी नदीबरोबरचा‘नेपाळ’ हा दक्षिण आशियामधील चीन, भारत आणि...
खाद्यतेलांचे आयात शुल्क वाढविले;...नवी दिल्ली/पुणे : देशातील सोयाबीनसह तेलबिया...
पीककर्जप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचा...यवतमाळ/अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप...
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र...
आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढालपुणे ः शेतकरी ग्राहक थेट आंबा विक्री...
‘डीबीटी’तून औजारे वगळण्यासाठी 'आयमा'चा...पुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी...