खानदेशात रब्बी हंगाम जेमतेम

खानदेशात रब्बी हंगाम जेमतेम
खानदेशात रब्बी हंगाम जेमतेम

जळगाव : खानदेशात यंदा सातपुडा पर्वतालगतच्या गावांसह आवर्षण प्रवण असलेल्या दक्षिण खानदेशातही रब्बी हंगाम जेमतेम आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची पेरणी झाली असून, ज्वारी व हरभऱ्याचे क्षेत्र अधिक दिसत आहे. हंगामाबाबतचे उद्दिष्ट मात्र यंदा साध्य होणार नसल्याची स्थिती आहे.

खानदेशात रब्बी हंगामात सुमारे चार लाख हेक्‍टवर पेरणी होईल, अशी अपेक्षा सप्टेंबरच्या सुरवातीला होती. परंतु आटणारे कृत्रिम जलसाठे व जमिनीमधील अल्प ओलावा लक्षात घेता रब्बीची पेरणी फक्‍ट अडीच ते पावणेतीन लाख हेक्‍टवर होईल, अशी स्थिती आहे. सप्टेंबरमध्ये चारच दिवस पाऊस झाला. तोदेखील हलक्‍या स्वरूपाचा होता. यामुळे कोरडवाहू रब्बी पिकांची पेरणी जळगाव जिल्ह्यातील हलकी व मुरमाड जमीन असलेल्या पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव भागात अपेक्षित झालेली नाही. तापी काठावरील शहादा, नंदुरबार, जळगाव, यावल, चोपडा, रावेर व मुक्ताईनगरात हरभरा, मका पेरणी बऱ्यापैकी झाली आहे.

सातपुडा पर्वतालगत यंदा पाण्याचे संकट आहे. पाऊसच नसल्याने नदी-नाले वाहून निघाले नाहीत. धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतालगतच्या निमझरी, कुवे, चोपडा तालुक्‍यातील आडगाव, वर्डी, खर्डी, यावलमधील सावखेडासीम, चिंचोली आदी भागात विहिरींची पाणी पातळी घटली आहे. केळी व पपईच्या बागांना पुरेसे पाणी नाही. यामुळे मका, गव्हाची पेरणी फारशी होणार नसल्याची स्थिती असून, ज्वारी व हरभरा यांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील दक्षिण, पश्‍चिम भागात सिंचन प्रकल्पांमध्येही जलसाठा नसल्याने अडचण आहे. सुमारे २१ ते २५ हजार हेक्‍टर क्षेत्राला लाभदायी असलेल्या गिरणा धरणातून अजूनही रब्बीसाठी आवर्तन सोडलेले नाही. यामुळे पेरणी आता दिवाळीनंतरच होईल, असे चित्र आहे.

दादरला २७०० दर जिल्ह्यात तापीकाठ व काळ्या कसदार जमिनीत पिकणाऱ्या दादरला (ज्वारी) प्रतिक्विंटल २७०० रुपये दर आहे. दादरच्या कडब्याला प्रतिशेकडा ४५०० रुपयांवर दर राहील. कमी पाण्यात व कोरडवाहू काळ्या कसदार जमिनीत हे पीक येते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दादर पेरणीला पसंती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com