agriculture news in marathi, rabbi season may become in trouble, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसाअभावी रब्बी अडचणीत येण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

गेल्या चार महिन्यांत पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे ऊस पीके वाळत चालली आहेत. परतीच्या पावसाची अपेक्षा असून अजून तरी तो बरसलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात पेरण्या होतील की नाही, याची शाश्वती कमीच आहे.  - विराज निगडे, शेतकरी, गोळुचे, ता. पुरंदर, जि. पुणे.

पुणे   ः पावसाचे चार महिने संपले तरीही जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यातच अनेक वेळा पडलेल्या पावसाचा खंडाचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. पावसाची स्थिती बघता रब्बी हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व भागातील शिरूर, पुरंदर, इंदापूर, बारामती, खेड, दौंड या तालुक्यांतील अनेक भागात रब्बी पेरण्या होण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे.   

पुणे जिल्हात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ८१९.७ मिलिमीटर म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडला आहे. खरीप हंगामातील सरासरी दोन लाख ३० हजार ८३० हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख ६२ हजार ३७० हेक्टरवर म्हणजेच ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली.

मात्र, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात पावसाच्या कालावधीत चांगलाच खंड पडला असून कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याचे चित्र होते. त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर झाला आहे. चार महिन्यात झालेला बहुतांशी पाऊस हा पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ,मुळशी, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यात झाला आहे. पूर्व पट्यातील खेड, हवेलीचा पूर्व भाग, शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यात पावसाने अनेकवेळा हुलकावणी दिली.

अनेक ठिकाणी पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पीक उत्पादनात ४० टक्क्यांहून अधिक घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सुत्रांनी वर्तविली आहे. जिल्ह्यात भात पीक निसवण्याच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच पावसाचा खंडामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे.

खरिपात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांसह, उसावर हुमणीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. रब्बी हंगामासाठी पुरेसे पाणी नसल्याने ज्वारी, हरभरा, गहू यासारख्या पिकांची पेरणी करणेही अवघड झाले आहे, असे मुखई (ता. शिरुर) येथील शेतकरी  नवनाथ गरूड यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...