agriculture news in marathi, rabbi season planning, amravati, maharashtra | Agrowon

अमरावती जिल्ह्यात रब्बीसाठी २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

अमरावती  : कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी मोठ्या क्षेत्राचे नियोजन केले. जिल्ह्यात यंदा २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

अमरावती  : कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी मोठ्या क्षेत्राचे नियोजन केले. जिल्ह्यात यंदा २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

यंदा ९५ टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला होता. मॉन्सूनचे वेळेत आगमन होऊन खरिपाच्या पेरण्या आटोपल्या. यंदा पाऊसमान चांगले होईल, असे गृहीत धरून कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात गत तीन वर्षांतील रब्बी पेरणी क्षेत्राची सरासरी दीड लाख हेक्टर आहे. यंदा तब्बल २ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी प्रस्तावित आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८३ हजार ४४६ हेक्टर क्षेत्र अतिरिक्त प्रस्तावित आहे.

पावसाने पाठ फिरविल्याने खरिपात सोयाबीनचे नुकसान झाले. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना केवळ दीड ते दोन क्विंटलचे उत्पादन हाती आले. त्यातून सोंगणीचा खर्चही निघाला नाही. निव्वळ सोयाबीनचा पेरा केलेल्या शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. निर्धारित वेळेत आवश्यक पाऊस झाला असता तर कदाचित कृषी विभागाचे नियोजन कोसळले असते, आता रब्बीत रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफुल ही पिके घेण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. पैकी करडईची पेरणी आता केली जात नाही. सूर्यफूल व मक्याला वन्यप्राण्यांचा धोका असल्याने त्याकडे शेतकरी पाठ फिरवितात.

रब्बी ज्वारी, गहू आणि हरभरा ही पिके प्राधान्याने घेतली जातात. हरभऱ्यासाठी १.६० लाख हेक्टर तर गहू पिकासाठी ६५ हजार क्षेत्र यंदा प्रस्तावित आहे. त्यासाठी १ लाख १२ हजार क्विंटल बियाणे लागण्याचा अंदाज आहे. या हंगामात महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळ ३० हजार तर खासगी कंपन्या ८२ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणार आहेत. गहू पिकाचा बियाणे बदल ८० तर हरभऱ्याचा बियाणे बदल ५० टक्के अपेक्षित आहे.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...