नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
ताज्या घडामोडी
बुलडाणा ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख ६५ हजार हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात अाले अाहे. त्यात सुमारे एक लाख ९ हजार हेक्टर हरभऱ्याचे क्षेत्र राहणार असून, उर्वरित ६६ हजार हेक्टर क्षेत्रात गहू, मका व इतर पिकांचा पेरा होईल, अशी शक्यता अाहे.

सोयाबीन काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात अाला असून, या आठवड्यापासून रब्बी पिकांच्या लागवडीला वेग येणार अाहे. मूग, उडदाचे पीक काढून काही शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीचे काम सुरूही केले. मुळात या हंगामात रब्बीसाठी पुरेशी अोल नसल्याने खरी चिंता वाढलेली अाहे. कृषी विभागाने दरवर्षीनुसार रब्बीचे नियोजन तयार केले. त्यात प्रामुख्याने हरभरा लागवड ही एक लाख ९ हजार हेक्टरवर होईल असा अंदाज दर्शविण्यात अाला. गव्हाची ३२ हजार, रब्बी ज्वारीची १४ हजार, मक्याची ९६०० अाणि उर्वरित क्षेत्रात इतर पिकांच्या लागवडीचे नियोजन अाहे.
परंतु ही लागवड प्रत्यक्षात पूर्ण होईल, याची खात्री यंत्रणांनासुद्धा वाटत नाही. अद्यापही एखाद-दुसरा पाऊस झाला तर रब्बीसाठी पोषक परिस्थिती होऊ शकते, अशी अाशा सर्वच व्यक्त करतात. कमी पाऊस; पाणीसाठाही जेमतेम जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ४६५.८ मिमी म्हणेजच ६९ टक्के पाऊस झाला अाहे. जिल्ह्यात नळगंगा या मोठ्या प्रकल्पात १३.१० दलघमी साठा अाहे. मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के साठा अाहे. यामुळे जिल्ह्यातील कुठल्याच प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता राहिलेली नाही.
- 1 of 348
- ››