agriculture news in marathi, rabbi season planning, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात रब्बीसाठी एक लाख टन खतांची मागणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

सातारा  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ७२८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. तसेच एक लाख आठ हजार ९४० मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारी पेरणीस प्रारंभ झाला आहे.  

सातारा  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ७२८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. तसेच एक लाख आठ हजार ९४० मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारी पेरणीस प्रारंभ झाला आहे.  

जिल्ह्यात रब्बी हंगामास पोषक वातावरण होण्यासाठी पावसाची गरज निर्माण झाली आहे. रब्बीत दोन लाख ६२ हजार ४८५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्या दृष्टीने बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आले आहे. माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांचा रब्बी हा प्रमुख हंगाम असल्याने या तालुक्‍यांत सर्वाधिक पेरणी होणार आहे.

पिकांमध्ये रब्बी ज्वारीची सर्वाधिक एक लाख ६७ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज असल्याने ४१७५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती.गहू पिकाची ४३ हजार ६०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज असून त्यासाठी २१ हजार ८०० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. हरभऱ्याची ३४ हजार ३०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज असून ६४३१ क्विंटल मागणी करण्यात आली आहे.

कृषी विभागाकडून रब्बी हंगामासाठी एक लाख ८ हजार ९४० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी यांचा समावेश आहे. परतीचा पावसाचा फायदा होण्याच्या दुष्टीने रब्बी ज्वारीच्या पेरण्यास प्रारंभ झाला आहे. पूर्वहंगामी ऊस लागवडदेखील शेतकरी करीत आहेत.
 

प्रमुख खते व मागणी (मेट्रीक टन)
खते मागणी
युरिया  ४१,९२०
डीएपी ९०१०
एमओपी ८१००
एनपीके ३६,७४०
एसएसपी १३,१७०

 

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...