वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीकडून अपेक्षा वाढल्या अाहेत. येत्या हंगामात जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टरपर्यंत रब्बी पिकांची पेरणी होण्याची शक्यता गृहित धरून नियोजन करण्यात अाले अाहे. या हंगामात हरभऱ्याची लागवड किमान पाच हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता अाहे.   

रब्बी हंगामात हरभरा उत्पादनात वाशीम जिल्हा अग्रेसर मानला जातो. बीजोत्पादनासाठी विविध कंपन्या, शेतकरी गट पुढाकार घेतात. जिल्ह्यात या वर्षात जोरदार पाऊस झालेला असल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा अाहे. हा साठा लक्षात घेता रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता अाहे.

जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ६७ हजार हेक्टर असून, यावर्षी ही लागवड ७२ हजार हेक्टरपेक्षा अधिक होण्याची शक्यता अाहे. जिल्ह्यात गव्हाची २५ हजार हेक्टरपर्यंत पेरणी होण्याची शक्यता अाहे. हंगामात पिकांची होणारी पेरणी पाहता रासायनिक खतांचे नियोजन करण्यात अाले अाहे. सोयाबीनची काढणी करून हरभरा लागवडीचा हंगाम वेगाने सुरू हाेणार अाहे.

मूग, उडदाची काढणी अंतिम टप्प्यात अालेली असून जिल्ह्यात हे क्षेत्रसुद्धा रब्बी लागवडीखाली येईल. हंगामात अातापर्यंत सरासरीच्या ९३.९९ टक्के पाऊस झाला अाहे. परतीच्या पावसाने हजेरी लावली तर रब्बीसाठी हे अधिक फायदेशीर होऊ शकेल. गेल्या अाठवड्यात विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला असला तरी वाशीममध्ये फारसा पाऊस झाला नव्हता. रब्बी हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात पावसाची हजेरी अावश्यक अाहे.  रब्बी पिकांचे अपेक्षित पेरणी क्षेत्र (हेक्टर) ः रब्बी ज्वारी -१०००, गहू - २५,०००, मका - ५००, हरभरा- ७२ हजार, करडई- ६००, सूर्यफूल- ५००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com