agriculture news in marathi, Rabbi seed production to get 23 crore 57 lakh subsidy | Agrowon

ग्राम बीजोत्पादनासाठी रब्बीत २३ कोटी ५७ लाखांचे अनुदान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 मे 2018

अकोला : गेल्या रब्बी हंगामात महाबीजच्या पुढाकाराने राज्यात राबवलेल्या ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुमारे २३ कोटी ५७ लाखांचे अनुदान वितरित करण्यात अाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील सुमारे तीन लाखांवर शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा देण्यात अाला. 

अकोला : गेल्या रब्बी हंगामात महाबीजच्या पुढाकाराने राज्यात राबवलेल्या ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सुमारे २३ कोटी ५७ लाखांचे अनुदान वितरित करण्यात अाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील सुमारे तीन लाखांवर शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा देण्यात अाला. 

महाबीजच्यावतीने खरीप तसेच रब्बी हंगामात ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबवला जातो. यासाठी केंद्राचे ६० टक्के अाणि राज्याचा ४० टक्के वाटा असतो. नुकत्याच झालेल्या रब्बीत गहू, हरभरा, भुईमूग या तीन प्रमुख पिकांसाठी ग्रामबीजोत्पादन योजना राबवण्यात अाली होती. हे बीजोत्पादन घेण्यासाठी महाबीजचे या तीनही पिकांचे एक लाख सहाशे क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले होते. राज्यात १६ हजार ६९७ गावांत योजनेची अंमलबजावणी करण्यात अाली. या गावांमधील गहू, हरभरा अाणि भुईमूग उत्पादन काढणाऱ्या तीन लाख एक हजार ५३० शेतकऱ्यांना २३ कोटी ५७ लाख रुपये अनुदान दिले गेले. या माध्यमातून रब्बीसाठी लाखो क्विंटल बियाणे महाबीजकडे उपलब्ध होणार अाहे.

अागामी खरिपात ग्राम बीजोत्पादन योजना सोबायीन अाणि धान या पिकांसाठी राबवली जाणार अाहे. या दृष्टीने महाबीजने केंद्राकडे प्रस्तावसुद्धा सादर केला. हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना अनुदानित दरात बियाणे उपलब्ध होऊ शकते. शेतकरी स्वतः बियाणे उत्पादन करू शकतात. त्यासाठी ही योजना महत्त्वाची अाहे.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...