agriculture news in marathi, Rabbi Seed Production Program at 418 hectare of Marathwada University | Agrowon

परभणी विद्यापीठाचा ४१८ हेक्टरवर रब्बी बीजोत्पादन कार्यक्रम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रावर यंदाच्या (२०१८-१९) रब्बी हंगामात ४१८.८ हेक्टरवर ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस आदी पिकांच्या पैदासकार, पायाभूत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. रब्बी बीजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून ३ हजार ३१५.५ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. अपुऱ्या पावसामुळे यंदा रब्बी बीजोत्पादनाचे क्षेत्र कमी करण्यात आले आहे. सिंचनासाठी सुविधा असलेल्या ठिकाणी प्राधान्याने बीजोत्पादन घेतले जाणार आहे. या संदर्भात वनामकृविचे संशोधन संचालक डॉ.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रावर यंदाच्या (२०१८-१९) रब्बी हंगामात ४१८.८ हेक्टरवर ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस आदी पिकांच्या पैदासकार, पायाभूत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. रब्बी बीजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून ३ हजार ३१५.५ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. अपुऱ्या पावसामुळे यंदा रब्बी बीजोत्पादनाचे क्षेत्र कमी करण्यात आले आहे. सिंचनासाठी सुविधा असलेल्या ठिकाणी प्राधान्याने बीजोत्पादन घेतले जाणार आहे. या संदर्भात वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी माहिती दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांतील विविध पिकांची संशोधन केंद्रे, कृषी विद्यालये, कृषी महाविद्यालये आदी मिळून एकूण ४० ठिकाणच्या प्रक्षेत्रावर यंदाच्या रब्बी हंगामात ४१८.८ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर ज्वारी, गहू, करडई, हरभरा, जवस, सूर्यफूल या पिकांच्या पैदासकार, पायाभूत आणि प्रमाणित बियाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ज्वारीच्या विविध वाणांचा एकूण ४६.५ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार आहे. त्यापासून ५५८ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

गव्हाच्या विविध वाणांचे ५.८ हेक्टरवर बीजोत्पादन घेणार असून एकूण ११६ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. करडईच्या विविध वाणांचे २०२.५ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून १ हजार ४१७.५ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. हरभऱ्याच्या विविध वाणांचे १५८ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून, त्यापासून १ हजार १८५ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. जवसाचे ३ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून त्यापासून १५ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. सूर्यफुलाचे ३ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून २४ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

विविध पिकांच्या वाणांचे बीजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये) कंसात बियाणे उत्पादन (क्विंटलमध्ये) ः

ज्वारी- परभणी मोती ः १६ (१९२० सीएसव्ही १८ ः ५.५ (६६), परभणी शक्ती ः २३ (२७६). पीएमएस २८ ए इन्टू बी  ः १ (१२).
गहू - एनआयएडब्ल्यू ३०१ (त्र्यंबक)ः २ (४०), नेत्रावती ः १.८ (३६), समाधान ः २ (४०).
करडई - पीबीएनएस १२ (परभणी कुसूम) ः १३२ (९२४) , पीबीएनएस ४० (बिनकाटेरी) ः २२ (१५४), पीबीएनएस ८६ (पूर्णा) ः ४८.५ (३३९.५).
हरभरा- बीडीएनजी ७९७ (आकाश) ः ११२ हेक्टर (८४०), बीडीएनजीके ७९८ (काबुली) ः ४२ (३१५), फुले विक्रम ः ४ (३०).
जवस - एलएसएल ९३ ः ३ (१५).
सूर्यफूल - एमएस १७ ए ः १.५ (१२), एमएस १७ बी ः ०.५ (४), आरएचए १०१ ः १ (८).

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...