agriculture news in marathi, rabbi sowing area decreased by 1.5 percent, Maharashtra | Agrowon

रब्बी पेरणी दीड टक्क्याने माघारली
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली  ः देशात यंदा रब्बी हंगामातील पेरणी मागील वर्षाच्या तुलनेत दीड टक्क्याने माघारली आहे. गेल्या वर्षी रबी पेरणी ६४.१७ दशलक्ष हेक्टरवर झाली होती. त्यातुलनेत यंदा आतापर्यंत ६३.२३ दशलक्ष हेटक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीरून मिळाली.

नवी दिल्ली  ः देशात यंदा रब्बी हंगामातील पेरणी मागील वर्षाच्या तुलनेत दीड टक्क्याने माघारली आहे. गेल्या वर्षी रबी पेरणी ६४.१७ दशलक्ष हेक्टरवर झाली होती. त्यातुलनेत यंदा आतापर्यंत ६३.२३ दशलक्ष हेटक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीरून मिळाली.

यंदा देशातील बऱ्याच भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातच खरिपातील पिकांची उशिरा काढणी झाली आणि जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने अनेक ठिकाणी रब्बी पेरणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे रब्बी पेरणी यंदा माघारली आहे. तसे पाहिल्यास रब्बी पेरणीवर मॉन्सूचा थेट परिणाम होत नाही; परंतु जमिनीत ओलावा असेल, तरच पेरणी करणे शक्य होते.

कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून गव्हाची पेरणी ५.४ टक्क्यांनी कमी होऊन ३०.०७ दशलक्ष हेक्टर आली आहे. मागील हंगामात गव्हापेक्षा हरभरा पिकांच्या दरात सातत्य राहिल्याने शेतकरी यंदा हरभरा पिकाकडे वळले आहेत. हरभऱ्याची पेरणी यंदा ८.३ टक्क्यांनी वाढून १०.७ दशलक्ष हेक्टरवर झाली आहे. 

कडधान्य लागवडीखालील क्षेत्रात यंदा ५.३ टक्क्यांनी वाढ होऊन १६.६ दशलक्ष हेक्टर झाले आहे. तसेच मोहरी पिकाच्या पेरणीत ७.१ टक्के घट होऊन ६.६८ दशलक्ष हेक्टर झाली आहे. राजस्थानमध्ये यंदा झालेल्या कमी पावसाने मोहरी पिकाखालील क्षेत्र घटले आहे.  
 

देशातील यंदा आणि मागील वर्षातील पीकनिहाय पेरणी (दशलक्ष हेक्टरमध्ये)

पिक     २०१७-१८     २०१६-१७
हरभरा     १०.७२  ९.९०
भरडधान्य   ५.६३     ५.७२
भुईमूग     ६.०४ लाख  ६.०३ लाख
मोहरी     ६.६८  ७.०६
तेलबिया     ८.०३ ८.४४
ज्वारी    ३.०९    ३.२२
मका १.६७  १.६३
कडधान्य   १६.६    १५.८
भात    २.८६     २.४२
गहू  ३०.०७  ३१.७८

  
        
 

     

इतर अॅग्रो विशेष
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...