agriculture news in marathi, rabbi sowing become late due to lack of rain, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात रब्बी पेरण्या लांबणीवर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

कर्जत तालुक्‍यात पाऊस नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या होण्याची शक्‍यता दिसत नाही. चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. जनावरे जगवणे शेतकऱ्यांना अवघड होणार आहे. शासनानेच आता दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करण्याची गरज आहे.
- मनोहर लाडाणे, डिकसळ, ता. कर्जत, जि. नगर.

नगर   ः जिल्ह्यामध्ये यंदा पुरेसा पाऊस नाही. परतीचा पाऊस ही गायब झाला, त्यामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. पाऊस नसल्याने पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे रब्बीच्या पेरण्या होतील की नाही, याची शाश्‍वती नाही. खरिपाची पिके वाया गेलीच, आता रब्बीत तर परिस्थिती अधिक गंभीर असेल हे स्पष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नगर जिल्ह्याने मागील दहा वर्षांच्या काळात दुष्काळाच्या गंभीर झळा सोसल्या आहेत. मागील दोन वर्षांत चांगल्या पावसामुळे स्थिती चांगली होती. आता यंदा पुन्हा परिस्थिती गंभीर झाली आहे. नगर जिल्ह्यामध्ये यंदा सुरवातीपासूनच पाऊस नाही. त्यामुळे सुरवातीलाच अल्प पावसावर खरीप पेरण्या कराव्या लागल्या. मात्र मध्यंतरीच्या काळात पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मूग, उडीद, सोयाबीन व अन्य पिकांचे पन्नास टक्‍क्‍यांच्या जवळपास नुकसान झाले. खरीप तर गेला, किमान रब्बीत चांगली पिके येतील, अशी आशा असताना रब्बीची तर पेरणी होण्याचीही शक्‍यता नाही.

जिल्ह्यामध्ये सुरवातीपासून पाऊस नसल्याने नदी, नाले, तलाव, कोरडेठाक आहेत. विहिरींचीही पाणी पातळी वाढली नाही. परतीच्या पावसावरच रब्बीचे भवितव्य अवलंबून होते. मात्र, परतीचा पाऊस न पडताच गायब झाला. भंडारदरा, निळवंडे धरण भरलेले असले तरी मुळात फारसा पाणीसाठा झाला नाही. या धरणाच्या लाभक्षेत्रात काही प्रमाणात पाणी मिळेल, परंतु दुष्काळी भाग असलेल्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर, शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यांत परिस्थिती गंभीर असणार आहे. पाणीच नाही तर रब्बीची पेरणी कशी करायची याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पाऊस येईल या आशेने शेवगाव तालुक्‍यातील काही भागात ज्वारीची पेरणी झाली होती. मात्र, तेही पेरलेले आता वाया गेले आहे. कृषी विभागाकडेही अजून रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्याची नोंद नाही. त्यामुळे यंदा रब्बीत पेरण्या होण्याची शक्‍यताच धुसर झाली आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार जिल्ह्यामधील चौदापैकी सुमारे बारा तालुके दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...