agriculture news in marathi, Rabbi sowing crisis in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी संकटात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

सांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा झाला नाही. आता आॅक्टोबर महिना निम्मा संपला तरी परतीचा मान्सून पाऊस झाला नसल्यामुळे रब्बीच्या पेरण्याही पूर्णत: खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात केवळ ६ टक्केच रब्बीच्या पेरण्या झाल्यामुळे निम्म्या जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आले.

सांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा झाला नाही. आता आॅक्टोबर महिना निम्मा संपला तरी परतीचा मान्सून पाऊस झाला नसल्यामुळे रब्बीच्या पेरण्याही पूर्णत: खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात केवळ ६ टक्केच रब्बीच्या पेरण्या झाल्यामुळे निम्म्या जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आले.

जिल्ह्यात रब्बीचे दोन लाख ५१ हजार ४६७ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी आत्तापर्यंत केवळ १५ हजार ९२० हेक्टरवरच पेरणी झाली. तिची टक्केवारी केवळ ६ टक्केच आहे. रब्बी हंगामातील पेरणी सर्वसाधारणपणे १ आॅक्टोबरपासून सुरू होते. परंतु, पुरेसा पाऊस नसल्यामुळे या वेळी पेरण्याच नाहीत. वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांनी रब्बीच्या पेरण्या सुरू केल्या आहेत.

विहिरी, पाणीपुरवठा योजनांमधून पाणी देऊन गहू, हरभरा, ज्वारी, रब्बी मका पेरणीस सुरवात केली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव, मिरज पूर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेतीच्या मशागती करून ठेवल्या आहेत. पण परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामातील पेरण्याच सुरू केलेल्या नाहीत.  

खरीप हंगामाचे विदारक चित्र असताना, शेतकरी परतीच्या पावसाकडे लक्ष ठेवून होता. जमिनीची मशागत करून शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी सज्ज असताना, परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

विहिरी, पाझर तलावांनीही तळ गाठला
निम्म्या जिल्ह्यात मान्सून आणि परतीचा पाऊसच झाला नसल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यांतील पाझर तलाव आणि विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यात मध्यम प्रकल्प पाच आणि लघु प्रकल्प ७९ आहेत. ६९ प्रकल्पात  २५ ते ३५ टक्केच पाणीसाठा आहे. यामुळे जत, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनास टँकर सुरू करावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजनही सुरू केले.

इतर बातम्या
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...