agriculture news in Marathi, rabbi sowing decline by 20 percent, Maharashtra | Agrowon

रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटली
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या मॉन्सून हंगामात पावसाने पाठ फिरविली. काही ठिकाणी सुरवातीपासूनच पाऊस झाला नाही, तर अनेक ठिकाणी शेतातून पाणीसुद्धा वाहिले नाही. परतीच्या पावसानेही निराशा केली. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. देशात रब्बीच्या आतापर्यंत १११ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, सरासरी क्षेत्रापेक्षा २० टक्के कमी पेरणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या मॉन्सून हंगामात पावसाने पाठ फिरविली. काही ठिकाणी सुरवातीपासूनच पाऊस झाला नाही, तर अनेक ठिकाणी शेतातून पाणीसुद्धा वाहिले नाही. परतीच्या पावसानेही निराशा केली. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. देशात रब्बीच्या आतापर्यंत १११ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, सरासरी क्षेत्रापेक्षा २० टक्के कमी पेरणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदाच्या रब्बी हंगामात १ हजार ४२५ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये यंदाच्या पावळ्यात बहुतेक ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. तर, अनेक ठिकाणी अत्यल्प पाऊस झाला. यंदाच्या मॉन्सूनच्या काळात भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा ९ टक्के कमी झाला आहे.

वर्तविलेला पाऊस आणि अंदाज यामध्ये मोठी तफावत असल्याने स्थिती बिकट बनली आहे. यंदा मॉन्सूनच्या काळात देशात होणाऱ्या पावसाची सरासरी ८८७.५ मिलिमीटर असताना ८०४ मिलिमीटर पाऊस झाला, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यंदा हवामान विभागाने देशात सरासरीच्या ९७ टक्के पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. 

कडधान्य, भरडधान्याची पेरणी कमीच
रब्बीतील तेलबियांची पेरणी मागील वर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी घटून ३७.१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच, खरिपातील महत्त्वाचे उत्पादन असणाऱ्या अन्नधान्याची पेरणी २० टक्क्यांनी घटली असून, आतापर्यंत १५.२ लाख हेक्टवर पेरणी झाली आहे. कडधान्य पेरणीतही २८ टक्के घट झाली आहे. कडधान्याची आतापर्यंत ३९.२ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच, रब्बीतील हरभरा, तूर, वाटाणा, मूग आणि उडीद या कडधान्यांची पेरणी घटली आहे.

६७ टक्के जलसाठा 
मॉन्सूच्या काळात चांगला पाऊस झाला नसल्याने त्याचा परिणाम जलाशयांतील पाणीसाठ्यावर झाला आहे. देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये १०७.८८ अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. जलाशयांच्या एकूण क्षमतेच्या हा पाणीसाठा ६७ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून मिळाली. हा पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत १.९ टक्क्यांनी अधिक आहे.  मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये ३१.४७ अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. एकूण क्षमेतेच्या ७४ टक्के पाणीसाठा आहे. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राज्यस्थान या राज्यांमध्ये एकूण क्षमतेच्या ८५ टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षीच्या तुलनेत तो अधिक आहे. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांध्ये ६१ टक्के साठा आहे. मागील वर्षी ६४ टक्के पाणीसाठा होता. पूर्व भारतातील झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांत ७० टक्के पाणीसाठा आहे. तर, पश्‍चिम भारतातील गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये केवळ ५३ टक्के पाणीसाठा आहे.

देशातील पीकनिहाय झालेली पेरणी (लाख हेक्टरमध्ये)

पीक  २०१८-१९ २०१७-१८
गहू  १५.१९ १२.६५
भात  ५.२४  ७.६६
कडधान्य  ३९.०५ ५४.३४
भरडधान्य १४.१४  २२.६५
तेलबिया ३७.०९ ४०.८६
एकूण  ११०.७१ १३८.१६

 

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...