राज्यात रब्बीचा पेरा १६ टक्क्यांपर्यंत

राज्यात रब्बीचा पेरा १६ टक्क्यांपर्यंत
राज्यात रब्बीचा पेरा १६ टक्क्यांपर्यंत

पुणे : राज्यात खरीप पेरण्यांची लगबग वाढली असून, आतापर्यंत १६ टक्के पेरा झाला आहे. परतीचा पाऊस होऊनदेखील १८ तालुक्यांमध्ये कमी पाऊस असल्यामुळे तेथील रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना जास्त कसरत करावी लागेल, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यात १ जून ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ११९० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो व प्रत्यक्षात पाऊस १०१० मिलिमीटर म्हणजेच ८४ टक्के झालेला आहे. पावसाचा एकूण प्रवास पाहिल्यास १८ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस कमी झाल्यामुळे तेथे रब्बी हंगामासाठी कमी पाणीसाठा आहे. १०४ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के कमी पाऊस झालेला आहे. राज्यातील १२२ तालुक्यांमध्ये यंदा १०० टक्क्यांच्यावर पाऊस झाल्यामुळे तेथे रब्बी हंगाम चांगला राहिल. त्यामुळेच हरभरा पेऱ्यात यंदा भरपूर वाढ अपेक्षित आहे.

राज्यात रब्बीचा पेरा साधारणतः ५४.७५ लाख हेक्टरवर होतो. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात यापैकी ८.८० लाख हेक्टरवर पेरा झालेला आहे. नाशिक विभागात पेरणी अवघी पाच टक्के झालेली आहे. मात्र, पुणे विभागात पेरण्यांना वेग आला असून साडेसतरा लाख हेक्टरपैकी सव्वा चार लाख हेक्टरवर म्हणजेच २४ टक्के रब्बीचा पेरा आटोपला आहे.

कोल्हापूर विभागात सव्वा पाच लाख हेक्टरवर पेरा होतो. त्यापैकी आतापर्यंत २५ टक्के पेरा झालेला आहे. औरंगाबाद विभागात तीन तालुक्यांमध्ये कमी पाऊस असून विभागात आतापर्यंत १९ टक्के पेरा झालेला आहे. लातूर विभागात ११ टक्के पेरा आटोपल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सर्वात कमी पेरा नागपूर विभागात झालेला असून सव्वा चार लाख हेक्टरपैकी आतापर्यंत एक टक्काही पेरा झालेला नाही. राज्यात खरीप पिकाखालील क्षेत्र दुबार पिकाखाली आणण्याचा प्रयत्न यंदा कृषी विभागाकडून केला जाणार आहे. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र यंदा चार लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

कृषी सांख्यिकी विभागाने जाहीर केलेली २७ ऑक्टोबरपर्यंतची पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)
पीक सरासरी क्षेत्र गेल्या वर्षीचा पेरा चालू वर्षाचा पेरा टक्के
ज्वारी २६३०१५० ७११२९६ ६५०३२२ २५
गहू १५७२५६ १०८०४ १२६३७
मका १५७२५६ ३०२७२ २९९११ १९
हरभरा १३१८८६६- ७५३८० १७७०७५ १३
करडई १२१८२२ ३५२० २२५
जवस २६७४१ १८३ ३८
तीळ १८२८ ३८
सूर्यफूल ६८०१८ ५५६ १२९२
एकूण पेरा ५४७५१४२ ८३३७३५ ८७९७६२ १६

(टक्केवारीचे आकडे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा झालेल्या पेरणीचे आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com