agriculture news in marathi, rabbi sowing status, amaravati, maharashtra | Agrowon

अमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

अमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी आता रब्बी हंगामाकडे वळले आहेत. परतीचा पाऊस आणि जमिनीतील ओलाव्याअभावी जोखीम असताना या हंगामात आतापर्यंत २८ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

अमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी आता रब्बी हंगामाकडे वळले आहेत. परतीचा पाऊस आणि जमिनीतील ओलाव्याअभावी जोखीम असताना या हंगामात आतापर्यंत २८ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी १ लाख ६९ हजार ३४९ हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात गहू आणि हरभरा ही दोनच प्रमुख पिके आहेत. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ११ हजार २३८ हेक्‍टर तर गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ५७ हजार २९४ हेक्‍टर आहे. रब्बी ज्वारी, सुर्यफूल, करडई, मक्‍यासाठी अत्यल्प क्षेत्र प्रस्तावित आहे. जिल्ह्यात साधारणतः चांगली थंडी पडल्यानंतर गहू पिकाची पेरणी होते. दिवाळीपासून थंडीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीवर भर दिला. त्यानुसार आतापर्यंत २११० हेक्‍टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे.

हरभऱ्याचा तब्बल ४४ हजार ७५३ हेक्‍टर क्षेत्रात पेरा झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. परतीचा पाऊस न झाल्याने ओलाव्याचा अभाव असताना रब्बी पेरणी जोखमीची ठरते. मात्र खरीप हातून गेल्याने ही जोखीम शेतकऱ्यांनी घेतल्याचे चित्र आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी लागवड क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्‍त करतात.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...