agriculture news in marathi, rabbi sowing status, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार हेक्टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खरीप हंगाम तोट्यात गेला आहे. अाता रब्बी हंगामावरही तसाच परिणाम झालेला अाहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे जेमतेम क्षेत्रावर रब्बी पेरण्या अाजवर झाल्या अाहेत. अातापर्यंत ५० टक्के क्षेत्रही लागवडीखाली अालेले नाही. जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र सरासरी १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर असून, त्यापैकी सुमारे ५५,७९० हेक्टरवर अातापर्यंत पेरणी झाली अाहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. रब्बी हंगामात पेरणी झालेले पीकसुद्धा अागामी काळात किती दिवस तग धरेल हा प्रश्नच अाहे.

बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खरीप हंगाम तोट्यात गेला आहे. अाता रब्बी हंगामावरही तसाच परिणाम झालेला अाहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे जेमतेम क्षेत्रावर रब्बी पेरण्या अाजवर झाल्या अाहेत. अातापर्यंत ५० टक्के क्षेत्रही लागवडीखाली अालेले नाही. जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र सरासरी १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर असून, त्यापैकी सुमारे ५५,७९० हेक्टरवर अातापर्यंत पेरणी झाली अाहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. रब्बी हंगामात पेरणी झालेले पीकसुद्धा अागामी काळात किती दिवस तग धरेल हा प्रश्नच अाहे.

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या एकूण क्षेत्रापैकी हरभऱ्याचे क्षेत्र ७३ हजार ९१० हेक्टर अपेक्षित आहे. त्यापैकी ४७ हजार २५१ हेक्टरवर अातापर्यंत पेरणी झाली. ही लागवड सरासरीच्या ६४ टक्के क्षेत्रावर झाली आहे. या लागवडीत सर्वाधिक २६ हजार ८४० हेक्टरवर हरभरा पेरणी एकट्या बुलडाणा तालुक्यात झाली अाहे. मोताळा व नांदुरा तालुका रब्बी लागवडीत सर्वाधिक पिछाडीवर अाहेत.

दरवर्षी दिवाळीपर्यंत रब्बीची लागवड ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असते. या वेळी मात्र स्थिती बिकट अाहे. गव्हाचे क्षेत्र ५२,९४० हेक्टर असताना अातापर्यंत केवळ ४४९४ हेक्टरवर पेरणी झाली. गव्हाची लागवड सरासरीच्या अाठ टक्केच झालेली अाहे. रब्बीत या जिल्हयात ज्वारीची लागवड केली जाते. रब्बी ज्वारीचे क्षेत्र १६,२३० हेक्टर अाहे. अाजवर केवळ १९ टक्के म्हणजेच ३११० हेक्टरवर पेरणी झाली. रब्बी ज्वारी हा चाऱ्यासाठी महत्त्वाचा स्त्रोत ठरत असतो. लागवड कमी झाल्याने त्याचा परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर होण्याची शक्यता अाहे. दररोज जमिनीतील अोल कमी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर पेच बनलेला अाहे.

जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्याने सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्यता नाहीत. शेतकऱ्यांनी अातापर्यंत हिंमतीने रब्बीची पेरणी केली. जेथे अोल मिळाली तेथील हरभरा निघाला. मात्र अाता अोल कमी होत असल्याने पेरणी केलेल्या क्षेत्रात बियाणे कमी प्रमाणात उगवत असल्याचे प्रकार होत अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...