agriculture news in marathi, rabbi sowing status, washim, maharashtra | Agrowon

वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

वाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील पीक लागवडीबाबत मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात रब्बी पेरणी रखडली असून, जमिनीत ओल नसल्याचा फटका पेरणीला बसला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २४ टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज आहे.

वाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील पीक लागवडीबाबत मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात रब्बी पेरणी रखडली असून, जमिनीत ओल नसल्याचा फटका पेरणीला बसला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २४ टक्के पेरण्या झाल्याचा अंदाज आहे.

वाशीम जिल्ह्यात या वर्षी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. असे असतानाही पेरण्यांबाबत मात्र शेतकरी धाडस करायला तयार नसल्याचे स्पष्ट दिसून येते. वाशीम जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी सुमारे ९३ हजार हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. या नियोजित क्षेत्रापैकी आतापर्यंत २२ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. यात हरभऱ्याची सर्वाधिक १८ हजार हेक्‍टरवर लागवड झालेली असून, उर्वरित चार हजार हेक्‍टर क्षेत्रावर गहू आणि इतर पिकांची लागवड झाली आहे.

रब्बीसाठी जिल्ह्यात या हंगामात हरभऱ्यासाठी सुमारे ६२ हजार ४०० हेक्‍टर क्षेत्र नियोजित आहे. सोबतच गहू २८ हजार ४९७,  रब्बी ज्वारी १३९७ व इतर पिके मिळून हे लागवड क्षेत्र ९३ हजार हेक्‍टरपर्यंत पोचेल असा अंदाज होता. जिल्ह्यात झालेला पाऊस, प्रकल्पांमधील पाणी याबाबी समोर ठेवून नियोजन करण्यात आले. आता पेरणीची वेळ आली असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधीच परतीच्या पावसाने पूर्णतः पाठ फिरविल्याने ओल कमी झाली. त्यानंतरही शेतकरी संरक्षित सिंचन करून पेरणीच्या विचारात असताना वीजपुरवठ्याचा प्रश्‍न आडकाठी आणत आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतीसाठी तासन्‌ तास वीज बंद राहते. वीज रोहित्र जळणे, कमी दाबाने पुरवठा होणे या समस्या आहेत. सातत्याने कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने कृषिपंप जळण्याचे प्रकारही वाढत आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. अशा अडचणींमुळे रब्बी लागवड अत्यंत संथगतीने केली जात आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...