agriculture news in marathi, rabi acreage down | Agrowon

देशातील रब्बी पेरणी माघारली
वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

नवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८) रब्बी पेरणी ४४२.२९ लाख हेक्‍टरपर्यंत पोचली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. गतवर्षी या कालावधीत रब्बी पेरणीचे क्षेत्र ४४८.४८ लाख हेक्‍टर होते. लागवड क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत अद्याप सुमारे ६ लाख हेक्‍टरने कमी आहे.

नवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८) रब्बी पेरणी ४४२.२९ लाख हेक्‍टरपर्यंत पोचली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. गतवर्षी या कालावधीत रब्बी पेरणीचे क्षेत्र ४४८.४८ लाख हेक्‍टर होते. लागवड क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत अद्याप सुमारे ६ लाख हेक्‍टरने कमी आहे.

यंदा चांगल्या मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर जास्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गहू, हरभरा ही खरिपातील प्रमुख पिके आहेत. भाताची लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत भाताची लागवड ८.९८ लाख हेक्टरवर झाली होती. यंदा ती ११.८७ लाख हेक्टरवर पोचली आहे. कडधान्यांची लागवड १२७.६२ लाख हेक्‍टरवर झाली असून, गतवर्षी ती ११९.७३ लाख हेक्‍टर होती.

गहू, तेलबिया लागवडीत घट
शुक्रवारअखेर गव्हाची लागवड १९०.८७ लाख हेक्‍टरवर झाली असून, गतवर्षी या कालावधीत ती २०३.५६ हेक्‍टर होती. तेलबियांची लागवड गतवर्षीपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी तेलबियांची या कालावधीत ७२.१६ लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती. यंदा ती ६७.७९ लाख हेक्‍टरवर आली आहे. भरडधान्यांची लागवड गतवर्षी ४४.०५ लाख हेक्‍टरवर झाली होती. ती या कालावधीत ४४.१४ हेक्‍टरपर्यंत झाली आहे.

 

वर्षनिहाय रब्बी पेरणी स्थिती (८ डिसेंबरअखेरची)
पेरणी ४४२.२९ ४४८.३९
वर्ष २०१७-१८ २०१६-१७

(पेरणी : लाख हेक्टरमध्ये)

इतर ताज्या घडामोडी
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...