agriculture news in Marathi, Rabi crop getting dried in Khanapur tahsil, Maharashtra | Agrowon

खानापूर तालुक्‍यात रब्बी पिके वाळू लागली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

सांगली ः आम्हाला पाणी मिळालं तरच पिकं जगतील...तरच आमचं पोट भरंल...पाण्याविना पिकं वाळून गेली आहेत...आमचं आर्थिक नुकसान झालं आहे, अशी व्यथा खानापूर तालुक्‍यातील शेतकरी मांडत होते. टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाली असली तरी खानापूर तालुक्‍यातील काहीच भागाला पाणी मिळते; पण उर्वरित भागाला पाणी मिळतच नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके वाळू लागली आहेत.

सांगली ः आम्हाला पाणी मिळालं तरच पिकं जगतील...तरच आमचं पोट भरंल...पाण्याविना पिकं वाळून गेली आहेत...आमचं आर्थिक नुकसान झालं आहे, अशी व्यथा खानापूर तालुक्‍यातील शेतकरी मांडत होते. टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाली असली तरी खानापूर तालुक्‍यातील काहीच भागाला पाणी मिळते; पण उर्वरित भागाला पाणी मिळतच नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके वाळू लागली आहेत.

खानापूर तालुका हा घाटमाथ्यावर वसला आहे. खानापूर तालुक्‍यात यंदा अपेक्षेपेक्षा पाऊस झाला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी झालेल्या पावसावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. त्यानंतर परतीच्या पावसाची वाट पाहत होता. परतीचा पाऊसदेखील कमीच झाला. त्यामुळे रब्बी ज्वारी पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही.

पाणी कमी पडू लागल्याने पिके वाळू लागली आहेत. टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत तालुक्‍यातील १८ हजार ९७५ हेक्‍टर क्षेत्राला पाणी दिले जाते, असा अहवाल संबंधित विभागाकडे आहे; मात्र वास्तविकपणे केवळ पन्नास टक्‍क्‍यांहून कमी क्षेत्राला पाणी मिळते आहे. खानापूर तालुक्‍यातील उर्वरित भागाला सहा महिन्यांनंतर पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी निधीही आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी पाण्याची मागणी करत आहेत; परंतु टेंभू योजनेचे पाणी अद्यापही मिळालेले नाही.

द्राक्ष बागांना टँकरद्वारे पाणी
खानापूर तालुक्‍यात निर्यातक्षम द्राक्षाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी पाणीटंचाई भासते. प्रत्येक वेळी पाणी येईल अशी वाट पाहिली जाते; परंतु पाणी शेतापर्यंत आलेच नाही. पाण्याची कमतरता पडत असल्याने या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष पिकाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो; मात्र पाणी मिळवण्यासाठी आटपाडी तालुक्‍यातील नेलकरंजी येथील टेंभू सिंचन योजनेच्या कालव्यातून आणावे लागते. त्यामुळे टेंभू योजनेचे पाणी पळशी, हिवरे, जरंडी यासह अन्य गावात टेंभू योजनेचे पाणी द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...